हिंदु राष्ट्राच्या कृतीचे नवतेज जागवा ।

पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी

आज १५ जानेवारी या दिवशी ‘मकरसंक्रांत’ आहे. त्या निमित्ताने… 

तीळगूळ हा संक्रांतीचा ।
द्या हो साधका ।। १ ।।

त्यागाचा तीळ जाणा, प्रेमाचा गूळ म्हणा ।
ऐक्याची ही भावना, द्या हो साधका ।। २ ।।

वाजवा रे तुतारी, नादवा रे ऐक्य भेरी (टीप १) ।
हिंदु राष्ट्राच्या कृतीचे नवतेज जागवा ।। ३ ।।

व्हावे हिंदु राष्ट्र अन् अखंड भारत ।
आण ही मनीची, धरा हो साधका ।। ४ ।।

परम पूज्य (टीप २) ही देती आशिषा ।
पाठी आपुल्या आहे धैर्या ।
नका करू संकोचा । चला पुढे धरूनी धैर्या ।। ५ ।।

टीप १ : एक वाद्य

टीप २ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

– (पू.) श्रीमती विजया दीक्षित, बेळगाव (२५.१२.२०२२)