विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !

संभाजीनगर येथे २ विवाहित महिलांवरील अत्याचारांच्या घटना !

(प्रतिकात्मक चित्र)

संभाजीनगर – येथील नायगाव येथे रहाणार्‍या २९ वर्षीय विवाहित महिलेवर दीड वर्षापासून अत्याचार करणारा धर्मांध सय्यद शफी सय्यद हशम याला फुलंब्री पोलिसांनी ७ जानेवारी या दिवशी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर दुसर्‍या घटनेत धमकी देऊन विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी सुधीर थेटे याला कन्नड पोलिसांनी अटक केली आहे.

कन्नड तालुक्यात विवाहित महिलेवर अत्याचार !

पीडित महिला कन्नड शहरातील समर्थनगर येथील ब्युटी पार्लर येथे आली होती. त्या वेळी आरोपी सुधीर थेटे याने महिलेला ‘तुझ्या ४ वर्षीय मुलीला जिवे मारून टाकीन’, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने महिलेला बळजोरीने दुचाकीवरून एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिलेने कन्नड शहर पोलीस ठाण्यात आरोपी थेटे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

महिलांवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना आजन्म कारावासाची शिक्षा करणे आवश्यक !