हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवा ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

ठाणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

दीपप्रज्वलन करतांना सौ. धनश्री केळशीकर आणि श्री. प्रसाद वडके

ठाणे, २६ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करण्यासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. येथे नुकत्याच झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या. ‘लँड जिहाद, थूँक जिहाद आणि हलाल जिहाद रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अन् हिंदूंचे संघटन हाच प्रभावी उपाय आहे’, असे मार्गदर्शन समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले.

प्रत्येक हिंदूने किमान एका हिंदूला जागृत करण्याचे ध्येय ठेवावे ! – सुरेश वरपा, अध्यक्ष, सिरवी विकास समाज मंडळ

विश्‍वात सनातन धर्म हा एकच धर्म आहे आणि इतर सर्व पंथ आहेत. आपल्या धर्माचा ध्वज हा भगवा आहे. भगव्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप लढले. त्याचप्रमाणे आज हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे काळाची आवश्यकता आहे. प्रत्येक हिंदूने किमान एकातरी हिंदूला जागृत करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. यातून एक साखळी निर्माण होऊन मोठे काहीतरी साध्य होईल. अन्य पंथातील मुले धर्मासाठी सिद्ध होतात. आपणही धर्मासाठी कृतीशील व्हायला हवे !

सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

उपस्थित

ठाणे येथील ‘श्री सिरवी समाज विकास मंडळा’चे अध्यक्ष सुरेश वरपा, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटना, विश्‍व हिंदु परिषद, ‘वंदे मातरम् प्रतिष्ठान’, राम सेना, ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ या संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.