सातारा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदूंच्या तेजाचा आविष्कार !

दीपप्रज्वलनाने सभेचा प्रारंभ करतांना डावीकडून सद्गुरु स्वाती खाडये, सौ. भक्ती डाफळे आणि अधिवक्ता नीलेश सांगोलकर

सातारा – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील गांधी मैदान, राजवाडा, सातारा येथे २५ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत हिंदुतेजाचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक श्री. नीलेश सांगोलकर, तसेच रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती डाफळे यांनी मार्गदर्शन केले.