पिंपरी येथील वाबटूक मार्गात रविवारी पालट !

पिंपरी – सकल हिंदु समाज समन्वय समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी रविवारी पिंपरी येथे हिंदु जनगर्जना मोर्च्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे पिंपरी आणि चिंचवड येथील महामार्गावरील वाहतुकीत तात्पुरता पालट केला आहे. हा मोर्चा चिंचवड स्टेशन येथील क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असा असेल. रविवार, १८ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ ते १२ या कालावधीसाठी हा पालट असेल, तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.