पू. अश्विनीताई , कृतज्ञतापुष्पांजली तव चरणी !

पू. (सौ.) अश्विनी पवार

पू. अश्विनीताई, तुझ्याकडे पाहिले की, गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होते ।

सौ. कीर्ती जाधव

पू. ताई,

तुझ्याप्रतीचा प्रत्येकाच्या मनातील भाव फार निराळा ।

देवद आश्रमातील प्रत्येक साधकाच्या मनातील आनंदाला ।

आला आता उमाळा ।। १ ।।

आश्रमात पाऊल टाकताक्षणी ।

अनुभवतोय चैतन्य आणि आध्यात्मिक वातावरण ।

आश्रमासहितच प्रत्येक साधकाचे मन करतेय तू ।

गुरुमाऊलीला अपेक्षित असे निर्मळ आणि कोमल ।। २ ।।

मूर्ती तुझी इतकी आहे सात्त्विक आणि कोमल ।

तुझ्याकडे पाहून, तुझे शब्दमोती ऐकून ।

तुझ्यासारखेच गुरूंसाठी अखंड झटावे ।

हाच आदर्श मनी वसवतो, तुझा सहवास अगदी सहज ।। ३ ।।

तुझ्याकडे पाहिले की, गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होते ।

अशी आध्यात्मिक आदर्श ताई देऊन त्यांनी आम्हास ।

साधनेची वाट कशी चालावी, याचा आदर्श दिला आहे ।। ४ ।।

पू. ताई, तुझ्या भक्तीभावापुढे, तुझ्या गुरुसेवेच्या तळमळीपुढे ।

मी तर धुळीचा एक कण आहे ।

या धुळीच्या कणाला तुझ्याकडून अखंड शिकता येऊ दे ।

हीच प्रार्थना गुरुचरणी आहे ।। ५ ।।

– सौ. कीर्ती जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.१२.२०२०)