धर्माचरण आणि साधना केल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

  • तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा आविष्कार !

  • ३ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करतांना श्री. सुनील घनवट, त्यांच्या उजव्या बाजूला सद्गुरु नंदकुमार जाधव आणि डावीकडे कु. रागेश्री देशपांडे

नंदुरबार, १२ डिसेंबर (वार्ता.) – भारत देश पूर्वी आर्थिकदृष्ट्या सक्षम होता. तो विश्वालाही मार्गदर्शन करत होता. त्या काळी मंदिरे म्हणजे चैतन्याचे स्रोत होते. आज परिस्थिती पालटलेली दिसते. सर्वत्र पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण चालू आहे. हिंदुत्वनिष्ठ आणि साधू यांच्या हत्या होत आहेत. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी स्वतंत्र अल्पसंख्यांक आयोग आणि मंत्रालय यांची स्थापना होत आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंसाठी कोणताही आयोग किंवा मंत्रालय नाही. भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्त्व असतांना हा दुजाभाव कशासाठी ? छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जगदंबेच्या कृपाशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे आपणही धर्माचरण आणि साधना केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे, असे मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

सभेला संबोधित करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

जिल्ह्यातील तळोदा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर या दिवशी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठण यांनी सभेला प्रारंभ झाला. या सभेला समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीच्या नंदुरबार जिल्हा समन्वयक कु. रागेश्री देशपांडे यांनी संबोधित केले. सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती लाभली.

माता-भगिनींनो, स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. रागेश्री देशपांडे

सभेला संबोधित करतांना कु. रागेश्री देशपांडे

हिंदु धर्मातील मैत्रेयी, गार्गी, ब्रह्मपुत्रा, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राणी चेनम्मा अशा पराक्रमी स्त्रियांनी धर्मज्योत तेवत ठेवली. आज महिलांची स्थिती कशी आहे ? महिलांवरील अन्याय आणि अत्याचार यांच्या घटनांत वाढ होत आहे. वर्ष २०२१ मध्ये बलात्काराच्या ३१ सहस्र ६७७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक युवती लव्ह जिहाद आणि धर्मांतर यात अडकत आहेत. ‘बॉलिवूड’ही लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहे. हे थांबण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हावे !

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा ! – सुनील घनवट

सभेला संबोधित करतांना श्री. सुनील घनवट

नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागांत ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून आदिवासी बांधवांना आमीष दाखवून धर्मांतर करण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणावर चालू आहे. उल्हासनगर जिल्ह्यात १ लाख २५ सहस्र सिंधी बांधवांचे धर्मांतर झाले आहे. आदिवासी बांधवांची भूमी खरेदी करता येत नाही; म्हणून काही अन्य धर्मियांकडून त्यांच्या मुलींशी प्रेमाचे खोटे नाटक करून त्यांच्याशी विवाह केला जातो. त्यानंतर त्यांच्या शेतभूमी हडप केल्या जातात. नंदुरबारला लागूनच गुजरात आणि मध्यप्रदेश यांची सीमा असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात गोतस्करी केली जाते. या सर्व समस्यांवर एकच पर्याय आहे तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! त्यामुळे सर्वत्रच्या हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध व्हावे !

सभेप्रसंगी लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन कक्षास भेट देताना भाजपचे आमदार श्री. राजेश पाडवी (उजवीकडे)

क्षणचित्रे

१. बालदा, प्रतापपूर, मोरवड, कडेल, चिनोदा, रांजणी अशा अनेक गावांमधून ग्रामस्थ ट्रॅक्टरने सभेला आले होते.

२. कुंभार,भोई व जोहरी गल्ली येथील २५० हून अधिक महिला आणि पुरुष सामूहिक घोषणा देत सभास्थळी आले. या वेळी त्यांनी हातात लव्ह जिहादचे फलक आणि मशाल हाती घेतली होती.

३. वक्त्यांनी ठराव पारित करीत असताना सर्वांनी सामूहिक मोबाईलचा दिवा चालू करून प्रतिसाद दिला.

४. युवक ढोल ताशा वाजवत आणि भगवे ध्वज घेऊन सभा स्थळी दाखल झाले.

५. वक्त्यांचे विषय ऐकून अनेक तरुण, तरुणींनी स्वसंरक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी कक्षावर नोंदणी केली.

६. तळोद्यातील क्रांतिकारक वीर जननायक श्री बिरसा मुंडा यांच्या स्मारकाला वक्त्यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन केले.

७. गावातील बालधर्मप्रेमीनी वारकर्‍यांची वेशभूषा करून दिंडी काढत सभास्थळी केलेले आगमन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

८. तळोदा येथील कुंभार गल्ली, भोई गल्ली सभेला  महिला उपस्थित राहिल्याने स्वयंपाकाला उशीर होईल म्हणून त्या भागातील धर्मप्रेमीनी सर्वांसाठीच जेवणाची व्यवस्था केली.

९. स्थानिक धर्मप्रेमी तरुणांनी ठिकठिकाणी भगवे ध्वज लावून शहर भगवेमय केले.

१०. गेल्या १५ दिवसांपासून तळोद्यातील स्थानिक तरुणांनी ध्वज लावणे, पोस्टर लावणे, फ्लेक्स लावणे, शाळा महाविद्यालयात, गावांमध्ये विषय घेणे, सभेची पूर्वतयारी करणे या सेवांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.