काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी वाशिम येथे ‘भारत जोडो’ यात्रेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना क्षमेचे पत्र लिहिले होते’, असे सावरकरद्वेषी विधान केले. सद्यःस्थितीला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माफी मागितली कि नाही ?’, हा आजच्या काळात महत्त्वाचा विषय नाही; कारण राहुल गांधी यांनी किती वेळा माफी मागितली ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खरेतर राहुल गांधी यांनीच ३ वेळा चुकीची आणि निखालस खोटी वक्तव्ये करून नंतर माफी (क्षमा) मागितली आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या क्षमायाचनेची माहिती येथे देत आहोत.
राहुल गांधी यांनी मागितलेली माफी
- राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘चौकीदार’ म्हटले होते. त्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट झालेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी राहुल यांनी या वक्तव्यावर माफी मागितली होती.
- ‘राफेल’ या लढाऊ विमान खरेदी प्रकरणी राहुल गांधी यांनी टीका केली होती. तेव्हाही सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाली होती. त्यावर राहुल गांधी यांनी माफी मागितली होती.
- एका विषयावर राहुल गांधी संसदेत बोलत असतांना त्यांनी ‘मेक इन इंडिया’ (भारतात उत्पादन करणे)चा उल्लेख ‘रेप इन इंडिया’ (भारतात बलात्कार) असा केल्यामुळे संसदेत गदारोळ माजला होता. त्या वेळीही त्यांनी माफी मागितली होती.
(साभार : ‘हिंदुस्थान पोस्ट’ वृत्तसंकेतस्थळ)