‘तमिळनाडूचे माजी ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या कार्यकाळात (वर्ष २०२१ ते २०२३) घडलेल्या ३९७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) करावी’, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही या चौकशीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. यासंदर्भातील माहिती या लेखात पाहूया.

१. द्रमुक सरकारचे तत्कालीन ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना भ्रष्टाचार प्रकरणी कारावास
‘तमिळनाडू येथील द्रमुक सरकारचे तत्कालीन ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या कार्यकाळात ३९७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे त्यांना मंत्रीपद गमवावे लागले आणि अनेक दिवस कारावास भोगावा लागला. ‘तमिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड’ हे तमिळनाडू सरकारच्या मालकीचे सार्वजनिक क्षेत्रातील वीज आस्थापन आहे. या आस्थापनाच्या विद्युत् रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) खरेदी प्रक्रियेत ३९७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. या भ्रष्टाचाराची चौकशी ‘दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी विभागा’च्या संचालकांच्या माध्यमातून चालू होती. ही चौकशी ३ वर्षे प्रलंबित होती. त्यात पुढे काहीच झाले नाही. या चौकशी समितीने ४.४.२०२६ या दिवशी अंतिम अहवाल (क्लोजर रिपोर्ट) दिला आणि त्यात ‘काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने चौकशी बंद करण्यात यावी’, अशी शिफारस केली. या ३९७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची बातमी अनेक दिवस आणि वर्षे गाजली; पण या प्रकरणात त्यांनी स्वत:ला निर्दाेषत्व सिद्ध करून घेतले.

२. भ्रष्टाचाराचे अन्वेषण सीबीआयकडे देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात गेले. ‘अंतिम अहवालात चौकशी बंद करण्याची केलेली शिफारस योग्य नाही’, असे द्विसदस्यीय खंडपिठाने सांगितले. या अहवालावर जनतेचा विश्वास बसण्यासारखा नाही. त्यामुळे या प्रकरणातील चौकशी बंद न करता हे अन्वेषण सीबीआयकडे वर्ग करावे, अशा प्रकारचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आणि याचिका निकाली काढली.
३. मद्रास उच्च न्यायालयाच्या निवाड्यावर सर्वाेच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
मद्रास उच्च न्यायालयाच्या या निवाड्याच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला. द्रमुकचे नेते हिंदु सनातन धर्म संपवायला निघाले होते. ते हिंदु धर्माला महारोग आणि किडा मुंगीची उपमा देत होते. जनतेने त्यांची हकालपट्टी करून घरी बसवले, हे योग्यच केले. त्यातून त्यांचे नेते तथा तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री स्टॅलिनही सुटले नाहीत. त्यांचाही पराभव झाला.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२१.५.२०२६)
वातव्याधी आणि आयुर्वेदातील ‘पेन मॅनेजमेंट (वेदना व्यवस्थापन)’
कतारपासून कोळशापर्यंत : अखेर भारत स्वतःचे ऊर्जेवरील अवलंबित्व सोडू शकेल का ?
… तर जात्यात जाण्याची वेळ कधीही येऊ शकते !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !