फराजने हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवल्याचा आरोप !

आता पूर्णिया (बिहार) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण

पूर्णिया (बिहार) – येथील बनमनखी येथे लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. २४ नोव्हेंबर या दिवशी फराज नावाच्या एका २२ वर्षीय धर्मांध मुसलमानाने एका १९ वर्षीय हिंदु मुलीला पळवून नेल्याचा आरोप केला जात आहे. बिहार पोलीस फराजला अटक करत नसल्याचा आरोप करत लव्ह जिहाद्याला पाठीशी घालत असल्याचेही स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे फराजचे कुटुंबीय म्हणत आहेत की, दोघेही त्यांच्या इच्छेनेच फरार झाले आहेत.

अशातच फराज आणि पीडित हिंदु मुलीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून समोर आला आहे. यामध्ये फराज म्हणत आहे की, मुलीचे वडील स्थानिक नेत्याच्या साहाय्याने षड्यंत्र रचत आहेत, तर मुलगी म्हणत आहे की, तिचे वडील तिच्या मनाविरुद्ध तिचा दुसर्‍या ठिकाणी विवाह लावू इच्छितात. आम्ही दोघे गेली ४ वर्षे एकमेकांवर प्रेम करतोे.

संपादकीय भूमिका

हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे वशीकरण करण्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या प्रकरणातही हे षड्यंत्र यशस्वी करण्यासाठी तसे केले गेले नसेल, हे कशावरून ?