शिकवणी वर्गातील मुसलमान शिक्षकाने अल्पवयीन हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेले !

बेगूसराय (बिहार) येथील घटना

बेगूसराय (बिहार) – येथे एका शिकवणी वर्गात शिकणार्‍या अल्पवयीन हिंदु मुलीला शिक्षक महंमद आमीर याने पळवून नेले. ‘मुलीचे श्रद्धा वालकर प्रमाणे वाईट होऊ नये,’ अशी भीती तिच्या नातेवाइकांकडून व्यक्त केली जात आहे. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

गेल्या ४ वर्षांपासून ही मुलगी महंमद आमीर याच्याकडे शिकवणीसाठी जात होती. या काळात आमीर याने या मुलीला भ्रमणभाष संच दिला होता. याची माहिती पालकांना मिळाल्यावर त्यांनी ही शिकवणी बंद करून दुसर्‍या शिकवणी वर्गात तिला घातले होते.

संपादकीय भूमिका

हिंदु मुलींवर धर्माचे संस्कार होत नसल्याने आणि त्यांच्याकडून धर्माचरण केले जात नसल्यानेच अशा घटना सातत्याने घडत आहेत. हिंदूंच्या संघटनांनी याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !