हिंदु नाव धारण करून मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लग्न  !

लग्नानंतर धर्मांतरासाठी दबाव !

कटिहार (बिहार) – येथील मनिहारीमध्ये हिंदु नाव सांगून तौकीर आलम या मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. आता तो तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणू लागल्यावर हिंदु तरुणीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी आलमविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

१. तौकीर आलम याने स्वतःचे ‘राज राजपूत’ असे नाव सांगून पीडितहिंदु तरुणीशी फेसबुकवर मैत्री केली होती. त्यानंतर ते एकमेकांशी भ्रमणभाषवर बोलू लागले. त्याने तो देहलीत रहात असून त्याच्या वडिलांचे नाव अमित सिंह असल्याचे सांगितले होते.

२. हिंदु तरुणीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यावर या दोघांनी न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाह करून त्याने तिला घरी नेण्याऐवजी सुपौल येथे त्याच्या बहिणीकडे नेले. तेथे या तरुणीला तौफीर मुसलमान असल्याचे समजले. यासह ‘तो विवाहित असून त्याला ११ वर्षांची मुलगीही आहे’, अशी माहितीही तिला मिळाली.

३. यामुळे तिने तौकीर याला सोडून जाण्याचे सांगितल्यावर तौफीरने तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तिला धर्मांतर करण्यास सांगू लागला. पूजा करण्यास विरोध करून नमाजपठण करण्यास सांगू लागला, तसेच बुरखा घालण्यास सांगू लागला.

४. एकेदिवशी पीडिता संधी साधून घरातून पळून पोलीस ठाण्यात गेली आणि तौफीरच्या विरोधात तक्रार केली.

संपादकीय भूमिका 

देशात धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्याने मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे फावते आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतरही अद्याप सरकार याविषयी काही करतांना दिसत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही !