सनातन आश्रम, मिरज (जिल्हा सांगली) येथे राहून पूर्णवेळ साधना करणार्या सौ. अंजली अजय जोशी यांचा कार्तिक कृष्ण द्वादशी (२१.११.२०२२) या दिवशी ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त नागपूर येथील त्यांच्या वहिनी सौ. रमा राजेश देशमुख यांनी कवितेच्या माध्यमातून उलगडलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. अंजली अजय जोशी यांना ६० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
धन्य झाले मी, अंजलीताईने मला श्री गुरुचरणी आणले ।
बोलण्यात मनमोकळेपणा, सतत साधनेचे विचार ।
ईश्वराप्रती कृतज्ञताभाव अन् नामसाधनेत रममाण ।। १ ।।
सेवेची तत्परता, असे ती त्यागाची मूर्ती ।
धन अन् कुटुंब यांचे समर्पण केले श्री गुरुचरणी ।। २ ।।
प्रेमभावामुळे असे ती वात्सल्यमूर्ती ।
अन् अन्यायाविरुद्ध लढतांना वाटे जणू रणरागिणी ।। ३ ।।
अंजूताईतील हे सारे गुण मला भावले ।
धन्य झाले मी, अंजूताईने मला श्री गुरुचरणी आणले ।। ४ ।।
गुरुसेवेचे तेज मुखावर, वाणीत सरस्वतीचा वास ।
अंजूताईशी बोलतांना रंगून जाते मी सत्संगात ।। ५ ।।
तिच्या एकसष्टीचा भावसोहळा, संत-साधकांचा मेळावा ।
गुरुदेव करती कृपेचा पुष्पवर्षाव, सोहळा होईल मग आगळा ।। ६ ।।
चैतन्याचे भावाश्रू माझ्या डोळ्यांत आले ।
धन्य झाले मी, अंजूताईने मला श्री गुरुचरणी आणले ।। ७ ।।
– सौ. रमा राजेश देशमुख (१०.११.२०२२)