दमोह (मध्यप्रदेश) येथे दलित हिंदु दांपत्याला धर्मांतरासाठी पाद्य्राने दिले १ लाख २० सहस्र रुपये !

दांपत्याने चर्चमध्ये जाणे बंद केल्यावर पाद्य्राने परत मागितले चारपट पैसे !

प्रतिकात्मक छायाचित्र

दमोह (मध्यप्रदेश) – येथे एका दलित हिंदु दांपत्याला आमीष दाखवून त्यांना ख्रिस्ती बनवण्याची आणि नंतर धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या दांपत्यातील महिलेने ‘माझ्या पतीला पैसे देऊन आम्हाला दोघांना ख्रिस्ती बनवण्यात आले; मात्र जेव्हा आम्ही चर्चमध्ये जाणे बंद केले, तेव्हा पाद्री अजय लाल आणि त्याच्या सहकार्‍यांनी आम्हाला दिलेल्या पैशांपेक्षा चौपट पैसे परत मागितले’, असा आरोप केला. अजय लाल याने या महिलेच्या पतीला धर्मांतर करण्यासाठी १ लाख २० सहस्र रुपये दिले होते. यांतील ९० सहस्र रुपये तिने परत दिल्याचे म्हटले आहे, तसेच उर्वरित पैसे देण्यासही ती सिद्ध असल्याचे सांगत आहे. पुरावा म्हणून तिच्याकडे आरोपींची स्वाक्षर्‍या असलेली दैनंदिनी आहे.

संपादकीय भूमिका

  • यावरून ख्रिस्ती मिशनरी गरीब आणि दलित हिंदूंचे कशा प्रकारे धर्मांतर करतात, हे स्पष्ट होते ! याविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी तोंड उघडणार नाहीत !