मशीदसदृश असलेल्या म्हैसुरूतील बसस्थानकावर बुलडोझर फिरवणार ! – कर्नाटकचे भाजपचे खासदार

कर्नाटकचे भाजपचे खासदार प्रताप सिंह

म्हैसुरू – कर्नाटकचे भाजपचे खासदार प्रताप सिंह यांनी म्हैसुरू-ऊटी रस्त्यावरील मशीदसदृश बसस्थानकावर बुलडोझर फिरवणार असल्याचे म्हटले आहे. ‘मी सामाजिक संकेतस्थळावर हे बांधकाम पाहिले आहे. या बसस्थानकाला दोन घुमट आहेत. मध्यभागी एक मोठा असून त्याच्या बाजूला एक लहान घुमट आहे. ती मशीदच आहे. मी अभियंत्यांना ३-४ दिवसांत ते बांधकाम पाडण्यास सांगितले आहे. जर त्यांनी तसे केले नाही, तर मी बुलडोझर घेईन आणि ते पाडीन’, अशी चेतावणी सिंह यांनी दिली.

(म्हणे) ‘आता ते घुमट असलेली सरकारी कार्यालयेही ते पाडणार का ?’ – काँग्रेसचे नेते सलीम अहमद

कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे प्रमुख सलीम अहमद यांनी म्हैसुरूच्या खासदारांचे  विधान मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. ‘आता ते घुमट असलेली सरकारी कार्यालयेही ते पाडणार का ?’, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

संपादकीय भूमिका

  • असे मंदिराच्या आकारातील बससस्थानक निर्माण केले असते, तर एव्हना धर्मांध, काँग्रेसी, पुरोगामी, साम्यवादी, तथाकथित बुद्धीवादी, लोकशाहीवादी आदी सर्वांनी ‘शहराचे भगवेकरण केले जात आहे’, अशी ओरड केली असती. आता मात्र यांपैकी कुणीही एक शब्दही बोलणार नाही, याची निश्‍चिती बाळगा !