गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून साथीदाराची हत्‍या ! 

प्रतिकात्मक छायाचित्र

गडचिरोली – येथे नक्षलवाद्यांनी स्‍वतःचा साथीदार दिलीप हिचामी हा गुप्‍तहेर असल्‍याचा आरोप करून त्‍याची ८ नोव्‍हेंबर या दिवशी हत्‍या केली. नक्षलवाद्यांनी दिलीप याचा गळा आवळून खून करून शर्टात त्‍याच्‍या विरोधात एक कागद लावला आहे. त्‍यात त्‍याला देशद्रोही म्‍हटले आहे. दिलीप हिचामी याच्‍यावर नक्षलवादी शंकर राव यांच्‍या हत्‍येचा आरोप केला आहे. त्‍यामुळे जनतेच्‍या न्‍यायालयात त्‍याला शिक्षा देण्‍याची गोष्‍ट या पत्रकात लिहिली आहे.

या घटनेनंतर गट्टा पोलिसांनी दिलीप हिचामी याचा मृतदेह कह्यात घेतला आहे. पोलिसांना घटनास्‍थळावरून मिळालेल्‍या कागदपत्रावरून दिलीप उपाख्‍य नितेश हिचामी (रा. झुरेगाव) हा महाराष्‍ट्र पोलिसांनी पाठवलेला माणूस होता. पोलिसांनी त्‍याला वर्ष २०११ मध्‍ये एका मिशन अंतर्गत नक्षलवादी संघटनेकडे पाठवले होते. तेथे काम करत असतांना वर्ष २०१२ मध्‍ये ‘कसनसूर लोस’चा सदस्‍य झाला; पण वेळ आल्‍यावर पोलीस असल्‍याने २८ ऑक्‍टोबर या दिवशी डीव्‍हीसी सदस्‍य नक्षलवादी शंकर राव याला पहिल्‍या लक्ष्याखाली त्‍याने ठार केले होते.