(म्हणे) ‘हिंदुत्व हा धर्म नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे !’

काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्यानंतर आता माजी खासदार रमेश कट्टी यांचा प्रसारित झाला हिंदुविरोधी व्हिडिओ !

माजी खासदार रमेश कट्टी

बेंगळुरू – ‘हिंदु’ हा शब्द पर्शियन आहे. त्याचा अर्थ फारच घाणेरडा आहे’, अशा काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या संतापजनक वक्तव्याला पुष्कळ विरोध झाल्याने काँग्रेसने त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने सामाजिक माध्यमांतून पक्षाचे माजी खासदार रमेश कट्टी यांचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे; परंतु तोही हिंदुद्वेषीच आहे. यात कट्टी म्हणाले की, हिंदुत्व हा धर्म अथवा श्रद्धा नव्हे.  माझ्या माहितीनुसार ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु हा अनादि काळापासूनचा, ईश्‍वर-निर्मित असलेला एकमेव धर्म आहे. हे ज्ञात नसणे यातून काँग्रेसी नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट होते !