निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड !

निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर

मुंबई – मराठीतील जेष्ठ लेखक आणि विचारवंत, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांची वर्धा येथे होणार्‍या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि सनातनचे संत पू. सुधाकर चपळगावकर यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत.

श्री. नरेंद्र चपळगावकर न्यायमूर्ती होण्यापूर्वी वर्ष १९६१-६२ मध्ये लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. पुण्यात जानेवारी २०१२ मध्ये झालेल्या १३व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. त्यांनी २० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे.