(म्हणे) भारताला हरवल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी विवाह करीन !

पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडे मागणी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ऑस्ट्रेलियामध्ये साध्या टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा चालू आहे. यातील भारताचा ‘ब’ गटातील शेवटचा सामना झिम्बाब्वे संघाशी होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास भारत उपांत्य फेरीत पोचणार आहे; मात्र उपांत्य फेरीपूर्वी ‘झिम्बाब्वेने भारताला हरवावे’, अशी मागणी पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारी हिने ट्वीट करत केली आहे. ‘जर झिम्बाब्वेने भारताचा परभाव केला, तर मी झिम्बाब्वेतील मुलाशी लग्न करीन’, असे तिने म्हटले. यावर सामाजिक माध्यमांतून तिच्यावर टीका केली जात आहे.

संपादकीय भूमिका

भारताविषयी पाकिस्तान्यांमध्ये किती द्वेष आहे, हेच यातून लक्षात येते !