सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी (पू. आबा) (वय ८४ वर्षे) यांच्या सत्संगात अनुभवलेले अनमोल क्षणमोती !

‘सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी (पू. आबा) काही दिवसांसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास आले आहेत. २४.१०.२०२२ या दिवशी मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्या सहवासात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. जयराम जोशीआजोबा
श्रीमती मनीषा गाडगीळ

१. ‘पू. जयराम जोशी (पू. आबा) यांना भेटल्यावर माझे मन शांत आणि स्थिर झाले.

२. पू. आबांकडे पाहिल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावरील तेज पुष्कळ वाढल्याचे मला जाणवले.

३. त्यांच्याकडे पहातांना ‘मी प.पू. डॉक्टरांकडेच पहात आहे’, असे मला वाटले. त्या वेळी माझी भावजागृती झाली.

४. ते काही बोलत नव्हते; परंतु त्यांच्या डोळ्यांतील प्रीती आणि त्यांचे निर्मळ हास्य पाहून ‘ते माझ्याशी अंतर्मनातून संवाद साधत आहेत’, असे मला जाणवले.

५. त्यांच्या त्वचेला स्पर्श केल्यावर ती कापसाप्रमाणे मऊ लागत होती.

६. पू. आबांकडून येणार्‍या आनंदाच्या स्पंदनांमुळे ‘त्यांच्या खोलीतच थांबावे’, असे मला वाटत होते.

७. ‘त्यांच्या भेटीत माझा ‘निर्विचार’ नामजप आपोआप चालू झाला’, असे मला जाणवले.

८. त्यांच्या खोलीतून निघतांना मी त्यांना म्हणाले, ‘‘पू. आबा, मला तुम्हाला भेटून पुष्कळ आनंद झाला.’’ त्या वेळी त्यांनी हात जोडले. ते सतत कृतज्ञताभावात होते.

९. ‘पू. आबा पूर्ण अंतर्मुख झाले आहेत’, असे मला जाणवले.

१०. त्या रात्री पुष्कळ वेळ पू. आबा आणि प.पू. डॉक्टर यांचे स्मरण होऊन कृतज्ञताभाव जागृत झाला.

प.पू. डॉक्टर, ‘आपल्याच कृपेमुळे आम्हा सर्व साधकांना संतांचा सत्संग मिळत आहे. त्याचा आम्हाला लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक