२ मास रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात राहिल्यावर ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्मिता कानडे यांनी अनुभवलेली भावस्थिती !

सौ. स्मिता कानडे

‘मी गेल्या २ मासांपासून रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात रहात आहे. ‘सर्व ठिकाणी परात्पर गुरुदेव आहेत’, असे मला जाणवते. माझ्या अंतरातून ‘परम पूज्य’, असा धावा चालू असतो आणि मला केवळ ‘परम पूज्य’, असाच स्वर ऐकू येत असतो. माझी जशी शरणागती असते, तसे मला परात्पर गुरुदेवांचे स्मरण होत असते. माझे शब्द संपून गेले आहेत. मी केवळ ‘भावस्थितीत आणि गुरुस्मरणात आहे’, असे मला वाटते.’

– सौ. स्मिता कानडे (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), धारवाड, कर्नाटक. (५.१२.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक