उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. रंश पंकज सूर हा या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
(‘वर्ष २०१९ मध्ये चि. रंश पंकज सूर याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.’ – संकलक)
कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा (२६.१०.२०२२) या दिवशी पुणे येथील चि. रंश सूर याचा ५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि आजी यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘वर्ष २०१९ मध्ये ‘चि. रंश पंकज सूर महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६१ टक्के पातळीचा’, असे घोषित करण्यात आले होते. आता तीव्र त्रासामुळे त्याची पातळी तेवढीच राहिली आहे. त्याच्यावर नियमितपणे उपाय आणि योग्य संस्कार केल्यास त्याचे स्वभावदोष अन् त्याच्यावर आवरण असल्यास ते न्यून होईल आणि त्याची पातळी पुन्हा वाढेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१९.१०.२०२२) |
(‘रंश हे श्रीरामाचे एक नाव आहे’, असे त्याच्या आजीने सांगितले.)
चि. रंश पंकज सूर याला पाचव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. हर्षा पंकज सूर (रंशची आई), पुणे
१ अ. शांत आणि स्थिर : ‘रंश शांत आणि स्थिर आहे. त्याने कधीही कुठल्याच प्रकारचा त्रास दिला नाही.
१ आ. तो प्रतिदिन झोपतांना स्तोत्र म्हणतो.
१ इ. सात्त्विकतेची ओढ
१. तो नियमितपणे उशीखाली दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि श्रीकृष्णाचे चित्र ठेवून झोपतो.
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाहून तो ‘मला गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) गोष्ट सांग’, असे म्हणतो.
१ ई. कठीण प्रसंगात आजीला धीर देणे : ३१.१.२०२२ या दिवशी त्याच्या आजोबांचे (माझ्या सासर्यांचे कै. रामदास सूर यांचे) निधन झाले. त्या प्रसंगात रंश त्याच्या आजीला धीर देत होता. तो आजीला म्हणत होता, ‘‘आजी, आबा देवबाप्पाकडे गेले. तू रडू नकोस. मी आहे.’’
रंशसारखे गुणी बाळ आम्हाला दिले, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
२. सौ. चारूलता पानघाटे (रंशची आजी, आईची आई, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), पुणे
२ अ. ‘रंशच्या जन्मानंतर त्याच्या आईने (माझी मुलगी (सौ. हर्षा सूर हिने) साधना करायला आरंभ केला.
२ आ. उत्तम स्मरणशक्ती : रंश एकपाठी आहे. त्याला एकदा सांगितले की, त्याच्या लक्षात रहाते. प्रार्थना आणि जयघोष करणे, श्रीकृष्ण आणि सद्गुरु यांचा श्लोक, तसेच ‘शुभं करोति’ हे स्तोत्र म्हणणे, हे सर्व तो ऐकून शिकला. त्याला सांगितलेली गोष्ट तो जशीच्या तशी पुन्हा सांगतो.
२ इ. आतिथ्यशील : घरात कोणी पाहुणे आल्यास रंश त्यांना नमस्कार करतो आणि पाणी आणून देतो.
२ ई. व्यवस्थितपणा : तो स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवतो. त्याचे खेळून झाल्यावर तो सर्व खेळणी भरून ठेवतो. तो या कृती सहजतेने करतो.
२ उ. समंजस : त्याला ‘कोरोनाच्या कालावधीत बाहेर का जाऊ नये’, हे सांगितल्यावर त्याने बाहेर जाण्याचा हट्ट केला नाही. तो ‘नियमित मुखपट्टी (मास्क) लावणे, ‘सॅनिटायझर’ने हात धुणे, अत्तर-कापराचे उपाय करणे, इतरांनाही आठवण करून देणे’, या कृती तत्परतेने करत असे. आमच्या घराशेजारी रहाणार्या मुलाने मुखपट्टी लावली नसल्यास रंश त्यालाही मुखपट्टी लावून यायला सांगायचा.
२ ऊ. सेवेची आवड : वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेच्या कालावधीत रंश माझ्या समवेत सेवेला यायचा. तो जिज्ञासूंना निमंत्रण-पत्रिका देऊन ‘सिद्धार्थ सभागृहात गुरुपौर्णिमा आहे. तुम्ही साडेपाच वाजता या,’ असे बोबड्या स्वरात निमंत्रण द्यायचा.
२ ए. पावसाने मार्ग निसरडा होऊनही पुरंदर किल्ला चढून जाणे : २३.७.२०२२ या दिवशी आम्ही रंशला घेऊन पुरंदर किल्ला बघायला गेलो. सर्व जण किल्ला चढतांना ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, असा जयघोष करत होते. मार्ग पावसाने पूर्ण निसरडा होऊनही रंश त्याचे वडील आणि आजोबा यांच्यासह किल्ला चढून गेला. तो ‘मला कडेवर घ्या किंवा माझे पाय दुखले’, असे एकदाही म्हणाला नाही. मी त्याला विचारले, ‘‘तुझे पाय दुखले नाही का ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘आजी, मी जयघोष करत चालत होतो. त्यामुळे मला शक्ती मिळाली.’’ त्याचे बोलणे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ ऐ. सायकलची गोमूत्राने शुद्धी करणे : रंशला नवीन सायकल घेतल्यावर त्याने मला सनातनच्या गोमूत्राची बाटली मागितली आणि तो मला म्हणाला, ‘‘तू जशी गाडीची शुद्धी करतेस, तशी मीही सायकलची शुद्धी करतो.’’
२ ओ. भाव
२ ओ १. मी त्याला खाऊ दिल्यावर तो आधी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर आणि परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर खाऊ ठेवतो अन् नंतर स्वतः खातो. तो मला सांगतो, ‘‘आजी, तुला श्रीकृष्णबाप्पाने साहाय्य केले ना; म्हणून खाऊ सुंदर झाला.’’
२ ओ २. खेळण्यांशी खेळत असतांना ‘श्रीकृष्ण आणि गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) येणार आहेत’, असा भाव असणे : तो खेळणी वापरून रामनाथी आश्रम बनवणे, त्यात श्रीकृष्णाची खोली, गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) खोली, त्यांना बसायला आसन, विश्रांती घ्यायला पलंग, आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे साहित्य ठेवायला पटल इत्यादी करून तेथे श्रीकृष्णाचे छायाचित्र आणि अत्तर-कापूर ठेवतो. तो मला म्हणतो, ‘मी बरोबर केले ना ? आता परम पूज्य येणार आहेत. आपण प्रार्थना आणि नामजप करूया.’’
२ औ. ‘रंशची गुणवैशिष्ट्ये लिहितांना मला सतत चंदनाचा सुगंध येत होता. मला देह फुलाप्रमाणे हलका वाटत होता.
२ अं. स्वभावदोष : हट्टीपणा
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक ६.१०.२०२२)