बेलतंगडी (कर्नाटक) येथील भाजपचे आमदार हरीश पुंजा यांच्‍या गाडीचा पाठलाग करून तलवारीद्वारे धमकावले !

भाजपचे आमदार हरीश पुंजा

मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्‍यातील बेळ्‍तंगडी येथील भाजपचे आमदार हरीश पुंजा यांच्‍या चारचाकी गाडीचा काही जणांनी पाठलाग करून ती थांबवण्‍यास भाग पाडले. यासह त्‍यांना शिवीगाळ करत तलवारीचा धाक दाखवल्‍याची घटना १३ ऑक्‍टोबर या दिवशी शहराच्‍या बाहेरील फरंगीपेटे येथे घडली. आमदार पुंजा हे बेंगळुरूहून बेळ्‍तंगडी येथे परतत असतांना ही घटना घडली. पडील ते फरंगीपेठेपर्यंत आक्रमणकर्त्‍यांनी चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. या घटनेमागील कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

संपादकीय भूमिका

  • राज्‍यात भाजपचे सरकार असतांना एका आमदाराला अशा प्रकारचे पाठलाग करून धमकावले जाते, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद ! याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे !