नैसर्गिक संसाधने, शेती आदींचे जतन आणि संवर्धन करून भविष्यातील अन्नसुरक्षेच्या धोक्यापासून भारताला वाचवायला हवे !

‘जैविक रोबोट’ : जगावर अधिसत्ता गाजवण्यासाठी धनाढ्य भांडवलदारांनी आखलेले एक षड्यंत्र !

नुकताच अमेरिकेत बेडकाच्या एका प्रजातीपासून मिळवलेल्या पेशींतून ‘जैविक (जिवंत) रोबोट’ (xenobot) बनवण्यात आले. हे रोबोट एखाद्या प्राण्याच्या शरिरात सोडल्यानंतर ते स्वतः नवीन रोबोट निर्माण (प्रजनन) करू शकतात. सध्यातरी वैज्ञानिकांचे असे दावे आहेत की, अशा प्रकारचे जैविक रोबोट बनवणे, ही अत्यंत उपयोगी क्रांती असून प्लास्टिकचे लहान लहान कण, कर्करोगाच्या पेशी इत्यादी गोष्टी नष्ट करण्यासाठी यांचा पुष्कळ चांगला वापर केला जाऊ शकतो; परंतु जैविक तंत्रज्ञावर अधिक विश्वास ठेवून अजिबात चालणार नाही; कारण या संशोधनासाठी संपूर्ण खर्च अमेरिकेच्या सैन्याच्या पैशातून केला जात आहे, म्हणजेच भविष्यात या जैविक रोबोट तंत्रज्ञानाचा गैरवापर झाल्यास कोरोनापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होऊन ती संपूर्ण जगभरात थैमान घालू शकते. जर या तंत्रज्ञानाचा गैरवापर झाला, तर माणसांनी काय विचार करावा ? याच्यावरही नियंत्रण घेऊन माणसांची विचार करण्याची शक्तीच संपवण्याचे षड्यंत्र अशा घाणेरड्या प्रयोगातून आखले जाऊ शकते.

प्रा. भूषण भोईर

१. जैविक रोबोटसारखे अनेक प्रकार काही प्राण्यांमध्ये निसर्गतःच घडत असल्याचा जैविक तंत्रज्ञांनी केलेला अभ्यास !

अशा प्रकारचे (जैविक रोबोटसारखे) अनेक प्रकार निसर्गतःच काही प्राण्यांमध्ये घडत आले आहेत. त्याचा अभ्यास या जैविक तंत्रज्ञांनी केला आहे, उदा. ‘लुकोक्लोरीडियम’ (Leucochloridium) नावाच्या परजिवी किड्याचे देता येईल. हे किडे जीवनाचा आरंभ पक्षाच्या शरिरात करतात. पक्षाच्या शरिरात त्यांचे प्रजनन होऊन पक्षाच्या विष्ठेतून त्यांची अंडी बाहेर टाकली जातात. ही विष्ठा काही गोगलगायी खातात. जेव्हा ही अंडी गोगलगायीच्या शरिरात जातात, तेव्हा एखाद्या झोंबीप्रमाणे (व्यक्तींना खाणारे मृत आणि क्रूर काल्पनिक मानवी देह) ते गोगलगायीच्या मेंदूचा ताबा घेतात. त्यामुळे गोगलगायी त्यांच्या डोळ्यांजवळ एखाद्या किड्याप्रमाणे दिसू लागतात आणि त्यांना हे किडे मुद्दाम झाडाच्या पानाच्या वरच्या भागावर पक्षाच्या नजरेस पडतील, अशा ठिकाणी यायला भाग पाडतात. या गोगलगायी उघड्यावर आल्या की, पक्षी त्यांना खातात. अशा प्रकारे पुन्हा एकदा गोगलगायीमधून दुसर्‍या पक्षाच्या पोटात ते किडे जातात आणि तिथे प्रजनन करून त्यांची अंडी पक्षाच्या विष्ठेतून बाहेर येऊन दुसर्‍या गोगलगायीचा ताबा मिळवायचा प्रयत्न करतात. (निसर्गात अशा जिवांची कमतरता नाही, याचा पुरेपूर अभ्यास गेल्या काही दशकांत झाला आहे.)

२. धनाढ्य उद्योगपतींच्या (भांडवलदारांच्या) इशार्‍यावर चालणारे चौथ्या औद्योगिक क्रांतीचे युग !

थोडक्यात सांगायचे, तर अशा प्रकारचे प्रयोग करून वर उल्लेख केलेल्या गोगलगायीप्रमाणे मानवी मेंदूंवर ताबा मिळवून भविष्यात सर्व लोकांना मुठीत करून जगावर अधिसत्ता गाजवायचे प्रयोग प्रगत देश करत आहेत, अशी दाट शक्यता आहे; कारण हे प्रगत देशही बिल गेट्स, रोशेल, रॉकफेलर इत्यादी मोठ्या उद्योगपतींच्या इशार्‍यावर नाचत असतात. जगभरातील सर्वच सत्ता जरी सर्वसामान्यांच्या हातात असल्याचे दिसत असले, तरी त्या अप्रत्यक्षपणे हे उद्योगपतीच सरकारे बनवतात आणि पाडत असतात.

गेल्या ५० वर्षांत औद्योगिक क्रांतीचा विस्फोट होऊन अशा जागतिक महासत्ता उभ्या राहिल्या आहेत. या महासत्ता दिवसागणिक अधिकाधिक धनवान आणि क्रूर होत गेल्या आहेत. ही निवडक उद्योगपतींची घराणी त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडून आणलेल्या सरकारांकडून त्यांना हवे असलेले प्रकल्प लोकांवर लादत जातात. त्यांच्याजवळ असलेल्या अमर्याद धनाचा उपयोग करून प्रसारमाध्यमेही कह्यात घेऊन त्यांना हवे तसे विचार समाजावर थोपवत आले आहेत. यामुळे दिवसेंदिवस जगभरात गरिबी आणि लोकसंख्या वाढत गेली. पूर्वी कारखान्यात काम करण्यासाठी लोकांची आवश्यकता भासायची; परंतु आता केवळ काही यंत्रे ठेवून संपूर्ण कारखाना व्यापारी लोक चालवू शकतात आणि याच मार्गावरून जग जात आहे. यालाच ‘चौथ्या औद्योगिक क्रांतीचे युग’ म्हणतात.

३. निसर्गाचा समतोल ढासळत असल्यामुळे येणार्‍या काळात संपूर्ण जगभरात निर्माण होणारी विदारक स्थिती !

सध्या निसर्गाचा समतोल ढासळत आहे आणि जागतिक तापमानवाढ हाताबाहेर जात आहे. चीनमधील ६६ नद्या कोरड्या पडल्या आहेत. धरणात पाणी नसल्याने सर्व जलविद्युत् केंद्रे आणि तेथील नद्यांमधून होणारी सर्व जलवाहतूकही ठप्प झाली आहे. शेतीसाठीही पाणी नाही. अशातच बाहेर तापमान ४५ डिग्री सेल्सियसहून अधिक आहे. वीज नसल्याने सर्व कारखाने आणि मॉल बंद आहेत. त्यामुळे लोक घरी बसून आहेत. अन्ननिर्मितीही थांबलेली आहे.

पाकिस्तानात तर अगदी उलट परिस्थिती निर्माण झाली असून जवळपास अर्ध्याहून अधिक पाक अतीवृष्टीमुळे पाण्याखाली बुडाला असून तेथे भीषण अन्नतुटवडा निर्माण झाला आहे. भविष्यात या गोष्टी संपूर्ण जगभरात होणार आहेत, हे गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. जगभरात येत्या १० ते १२ वर्षांत हाहाःकार माजणार आहे. अन्ननिर्मिती अल्प आणि लोकसंख्येचा विस्फोट होणार आहे. बाजारात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतील, तेव्हा जनता रस्त्यावर येऊन ज्यांच्याजवळ अमर्याद संपत्ती आणि अन्नधान्याचे साठे आहेत, अशा लोकांच्या (धनाढ्यांच्या) घरांवर चालून जातील. त्यामुळे आज जे पुष्कळ श्रीमंत आहेत, त्यांचे जगणे उद्या कठीण होणार आहे. हे ‘युनो’च्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

४. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी भांडवलवादी शक्तींकडून जैविक रोबोट (xenobot) सिद्ध करण्याचा कुटील डाव !

‘यापुढे सुरक्षित जगायचे असेल, तर लोकसंख्या न्यून केलीच पाहिजे’, असा निर्धार या मोठ्या भांडवलदार घराण्यांनी केला आहे. थोडक्यात सांगायचे, तर हे मोठे भांडवलदार आता लोकांना किड्यामुंग्यांप्रमाणे मारून स्वतः सुरक्षित जगण्याचा प्रयत्न जोरात करत आहेत, हे स्पष्ट आहे. भारतातही सध्या शेतीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न मोठ्या भांडवलदारांकडून चालू झाले आहेत. भविष्यातील हे धोके जेवढे भांडवलदारांना समजतात, तेवढे सर्वसामान्य जनतेला समजत नाहीत. भांडवलवादी शक्ती जैविक रोबोट (xenobot) सिद्ध करत आहेत. त्यामुळे भविष्यात पुष्कळ मोठ्या प्रमाणावर लोकांना आपल्या (भांडवलदारांच्या) नियंत्रणात ठेवता येईल अथवा त्यांचा लसीकरण मोहिमेतून संहार करता येईल. जेणेकरून भविष्यात केवळ भांडवलदार लोकांच्याच पिढ्या सुरक्षित रहातील. त्यामुळे त्यांनी बनवलेल्या लसी, उत्पादने आदी कितपत सुरक्षित असतील, याची काही शाश्वती देता येणार नाही.

गेल्याच वर्षी जंगली हत्ती, माकड यांची संख्या वाढू नये; म्हणून भारतात एक विशेष लस टोचून हत्तीणीला कायमचे वांझ बनवले जाण्याविषयीचे एक विधेयक पर्यावरण मंत्रालयाने ठेवले होते, म्हणजेच प्राण्यांनाही वांझ बनवण्याच्या लसीचे प्रयोग करून झाले असून ते कधी गुपचूप तुमच्या-माझ्यावर (सर्वसामान्य जनतेवर) केले जातील, याची काही शाश्वती नाही. त्यामुळे यापुढे सुरक्षित जगायचे असेल, तर काळाची पावले ओळखून नैसर्गिक संसाधने, शेती, नद्या, समुद्र, खाड्या, जंगले जी अन्ननिर्मिती करतात आणि आपल्याला जगवतात, त्यांचे डोळ्यांत तेल घालून संरक्षण करावे लागणार आहे. त्यावर भांडवली शक्ती आक्रमण करत असून भारतात प्रतिदिन फुटबॉलच्या ४ मैदानांहून अधिक मोठ्या आकाराचे जंगल उद्ध्वस्त कले जात आहे. नद्या, खाड्या, समुद्र यांचा ताबा लोकांकडून भांडवली गुंतवणूकीद्वारे निवडक व्यापार्‍यांकडे जात आहे. हे थांबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

५. जनतेने नैसर्गिक संसाधने, शेती, आयुर्वेद, योग आदींवर आधारित ग्रामीण जीवनशैली जगणे, हाच भांडवलदारांपासून वाचण्याचा परिणामकारक उपाय !

भविष्याची आवश्यकता औद्योगिकीकरण नसून अन्न आणि पाणी ही आहे, हे सरकारने ओळखले पाहिजे. देशाच्या नागरिकांना सुरक्षित ठेवायचे असेल, तर त्वरित नैसर्गिक संसाधने, शेती आदींचे जतन करून त्याचे मूल्य ओळखले पाहिजे, अन्यथा भविष्यात जेव्हा अन्नसुरक्षा धोक्यात येईल, तेव्हा भारतासारख्या लोकसंख्येच्या देशात जो हाहाःकार माजेल, त्याला कोणतीच कायदा-सुव्यवस्था रोखू शकणार नाही. हे भविष्याचे पडसाद आहेत, जे सरकारने आजच ओळखून त्यादृष्टीने योग्य पावले उचलली पाहिजेत.

भविष्यात आयुर्वेद, योग, घरगुती जडीबुटी विज्ञान इत्यादींवर आधारित ग्रामीण जीवनशैली जगणे, हाच यावर उपाय आहे. आयुर्वेद, योग सर्वसामान्य लोकांच्या घराघरात पोचले पाहिजे. आयुर्वेदावर आधारित आस्थापने वाढवण्याऐवजी पारंपरिक ज्ञान वाढवून साधन असलेली जंगले, डोंगर टेकड्या वाचवल्या पाहिजेत. गावांमध्ये असलेल्या वैदूंचे (वैद्यांचे) पारंपरिक ज्ञान सर्वांपर्यंत पोचेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मातीची घरे बनवण्यासह नैसर्गिक शेती केली पाहिजे, म्हणजे आपोआप क्रूर आणि उद्दाम भांडवलदार लोकांकडे जाणारा पैसा बंद होईल.’

– प्रा. भूषण भोईर, सहप्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर (५.९.२०२२)