जोधपूर- येथे ‘इद मिलाद’च्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’च्या (धडापासून शिर वेगळे करण्याच्या) घोषणा देण्यात आल्या.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी जोधपूरमध्ये ‘इद मिलाद’च्या निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शेकडो मुसलमान तरुण सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या. मिरवणुकीत पोलीस उपस्थित होते. हिंदु संघटनांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी रोशन अली याला अटक केली. त्याचे अन्वेषण चालू आहे. पोलिसांनी रात्रभर धाडी टाकून आरोपींचा शोध घेतला. याआधीही जोधपूरमध्ये दंगल झाली होती.
Rajasthan: Islamists raise ‘Sar Tan Se Juda’ slogans in Jodhpur during Eid procession, one person arrestedhttps://t.co/2QOo7YWqfv
— OpIndia.com (@OpIndia_com) October 10, 2022
संपादकीय भूमिकाकाँग्रेसशासित राजस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ? |