पाकमध्ये आतंकवाद्यांकडून एका मंत्र्यासह विदेशी नागरिकांचे अपहरण !

प्रतीकात्मक छायाचित्र

इस्लामाबाद – जिहादी आतंकवादी हबीबुर रहमान गटाच्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताला गिलगिट-बाल्टिस्तानशी जोडणारा महामार्ग रोखून धरत कारावासात असलेल्या त्यांच्या साथीदारांच्या सुटकेची मागणी केली आहे. या वेळी तेथे अडकलेल्या अबैदुल्ला बेग हुंजा या गिलगिट-बाल्टिस्तानच्या वरिष्ठ मंत्र्यासह दोन विदेशी नागरिकांचेही आतंकवाद्यांनी अपहरण केले.

ज्या आतंकवाद्यांच्या सुटकेची मागणी करण्यात येत आहे, ते आणि हबीबुर रहमान या सर्वांवर वर्ष २०१३ मध्ये गिलगिट-बाल्टिस्तानमधील नांगा पर्वतावर १० विदेशी नागरिकांची हत्या केल्याचा आरोप आहे. बंदूकधार्‍यांनी चीन, युक्रेन, तसेच रशिया येथील ९ पर्यटकांसह एका पाकिस्तानी गाइड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.