कोरोना साथीच्या काळात हिंदु रुग्णांचे धर्मांतर केल्याचे प्रकरण
नवी देहली – ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे तत्कालीन अध्यक्ष डॉ. जॉन रोज ऑस्टिन जयलाल यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून कोरोना साथीच्या काळात हिंदु रुग्णांचे धर्मांतर केल्याच्या आरोपाची नोंद घेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने डॉ. जॉन यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश ‘देहली मेडिकल काऊन्सिल’ आणि आरोग्य मंत्रालय यांना एका पत्राद्वारे दिले.
‘कायदेशीर हक्क संरक्षण मंच’ने डॉ. रोज यांच्यावर वरील आरोप केला होता. या संदर्भात ‘कायदेशीर हक्क संरक्षण मंच’ने ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोगा’ला २५ जून २०२१ या दिवशी पत्र लिहून डॉ. रोज यांच्या वैद्यकीय व्यवसायाचा परवाना रहित करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या ‘आचार आणि वैद्यकीय नोंदणी मंडळा’ने १ सप्टेंबर २०२२ या दिवशी ‘देहली मेडिकल काऊन्सिल’ आणि आरोग्य मंत्रालय यांच्या संचालकांना नोटीस पाठवली होती.
गेल्या वर्षी हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. तक्रारदार रोहिज झा यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट करून डॉ. रोज यांनी हिंदु धर्माच्या विरोधात प्रचार करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. कोरोना रुग्णांच्या उपचारात आयुर्वेदिक औषधांपेक्षा अॅलोपॅथी औषधांची श्रेष्ठता दाखवून त्यांनी भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला होता, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|