साहिबगंज (झारखंड) येथे मुसलमानांकडून पोलिसांवर आक्रमण

तरुणींची छेड काढणार्‍या मुसलमान तरुणांना हाकलल्याच्या रागातून आक्रमण

साहिबगंज (झारखंड) – येथील राजमहल भागातील संगीदालान परिसरात ५० हून अधिक मुसलमानांनी पोलिसांवर आक्रमण केले. यात ३ पोलीस घायाळ झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात काही तरुणी फिरण्यासाठी आल्या होत्या. या वेळी काही मुसलमान तरुणांनी त्यांची छेड काढली. याविषयी तेथेच असणार्‍या पोलिसांकडे या तरुणीनी तक्रार केली. (परिसरात पोलीस असतांनाही मुसलमान तरुण तरुणींची छेड काढण्याचे धाडस दाखवतात, यावरून पोलिसांची पत काय आहे, हे लक्षात येते ! असे पोलीस जनतेच्या काय कामाचे ? – संपादक) त्यानंतर पोलिसांनी या मुसलमान तरुणांना तेथून हाकलून लावले. साधारण २ घंट्यांनंतर ५० हून अधिक मुसलमान तेथे आले आणि त्यांनी या पोलिसांवर आक्रमण केले. या वेळी पोलिसांनी काही मुसलमान तरुणांना पकडले. यात नासीर शेख, रिजाऊल शेख आणि सेराजुद्दीन शेख या तिघांचा समावेश आहे. पोलीस अन्य मुसलमानांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

झारखंडमध्ये ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ पक्षाचे सरकार असल्यामुळे राज्यात कट्टरतावादी मुसलमानांचे फावले आहे, त्याचेच हे दर्शक आहे. याविषयी आता कुणी काही बोलणार नाही !