दिवाळीमध्ये हिंदुबहुल भागात बाँबस्फोट करण्याचा ‘पी.एफ्.आय.’चा होता कट !

हिंदूंच्या नेत्यांना ठार मारण्याचेही षड्यंत्र उघड !

अटक करण्यात आलेले ‘पी.एफ्.आय.’चे कार्यकर्ते महंमद फैजान, महंमद रेहान आणि महंमद सुफियान

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (‘पी.एफ्.आय.’वर) बंदी घातल्यानंतर त्याची कटकारस्थाने आता समोर येत आहेत. ‘पी.एफ्.आय.’ने देशातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्या करण्यासाठी दिवाळीमध्ये देशातील अनेक राज्यांत हिंदूंची मंदिरे आणि हिंदुबहुल भाग यांना लक्ष्य करून बाँबस्फोट करण्याची योजना बनवली होती. लक्ष्मणपुरी येथून अटक करण्यात आलेले ‘पी.एफ्.आय.’चे कार्यकर्ते महंमद फैजान, महंमद रेहान आणि महंमद सुफियान यांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. ‘पी.एफ्.आय.’कडून तिच्या कार्यकर्त्यांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. पकडण्यात आलेल्या या कार्यकर्त्यांकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यांमध्ये बाँब कसे बनवावे, याची माहिती देण्यात आली होती. केरळ येथील रा.स्व. संघाच्या ५ नेत्यांना ठार करण्याचीही माहिती अन्वेषण यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर या नेत्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवादी संघटनांना धर्म असतो, हे आतातरी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मान्य करतील का ?