नाशिक येथे सैन्याच्या प्रतिबंधित विभागात अनोळखी ड्रोनच्या घिरट्या !

नाशिक – येथील सैन्याच्या अंतर्गत येणार्‍या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ अर्थात् ‘डी.आर्.डी.ओ.’च्या प्रतिबंधित भागात एक ड्रोन घिरट्या घालत असलेले एका शेतकर्‍याच्या निदर्शनास आले. चौकी क्र. २ च्या भिंतीलगत हे ड्रोन घिरट्या घालत असलेले त्याने पाहिले. याविषयी आडगाव पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.