बांगलादेशात नौका उलटून झालेल्या अपघातात २४ हिंदू भाविकांचा मृत्यू

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात पंचगड जिल्ह्यातील बोडा येथे २५ सप्टेंबर या दिवशी कोरोटा नदीमध्ये एक नौका उलटून झालेल्या अपघातात २४ हिंदूंचा मृत्यू झाला. हे हिंदू येथील बोदेश्‍वरी मंदिरात जात होते. या अपघाताच्या वेळी १० जणांना वाचवण्यात यश आले.

या नौकेमधून ७० ते ८० जण प्रवास करत होते. नौकेच्या क्षमतेपेक्षा ही संख्या अधिक होती. या अपघाताविषयी पंतप्रधान शेख हसीना यांना दुःख व्यक्त केले आहे.