भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. यंदा भाद्रपद अमावास्या (२५.२.२०२२) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या चैतन्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील काही साधक-साधिका त्या सेवा करतात, त्या खोलीत गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देत आहोत.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या देवीस्वरूप दिसून त्यांच्याकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ खोलीत आल्यावर देवीचे एक गीत लावण्यात आले होते. त्या वेळी त्या मला देवीस्वरूप दिसत होत्या. त्यांचा आशीर्वादाचा हात दिसत होता. ते गीत ऐकत असतांना वातावरणात वेगळाच भाव होता आणि भावजागृतीसुद्धा होत होती. त्या आम्हाला मार्गदर्शन करत असतांना त्यांच्या तोंडवळ्यावर वेगळेच तेज जाणवत होते. त्यांच्याकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत होते. तिथे ‘सूक्ष्मातून प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) आले आहेत’, असे मला जाणवले.’ – कु. सानिका जोशी, सनातन आश्रम, रामनाथी. (७.१०.२०२१) |
१. कु. दीपिका आनंद (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या समोर अप्सरा नृत्य करत असून त्यांच्यावर स्वर्गातून पुष्पवृष्टी होत असल्याचे जाणवणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ खोलीत आल्यावर देवीचे एक गीत लावण्यात आले होते. तेव्हा ‘तेथे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या समोर स्वर्गातील अप्सरा नृत्य करत आहेत आणि स्वर्गातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी होत आहे’, असे दृश्य मला दिसले.’
२. सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. ‘भूवैकुंठात भूदेवीच प्रकट झाली असल्याचे वाटून त्यांच्या मुखावरील तेज पाहू न शकणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा वाढदिवस, म्हणजे ‘साक्षात् रामनाथी आश्रमरूपी भूवैकुंठात भूदेवीच प्रकट झाली आहे’, असे मला वाटत होते. वाढदिवसाची सिद्धता केलेल्या कक्षात त्या येत असतांना त्यांच्या मुखावरील तेज इतके होते की, मला ते पहाता येत नव्हते. मी सतत त्यांच्या चरणांकडे पहात होते.’
३. कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. शरीर हलके होऊन तरंगत असल्याप्रमाणे जाणवणे : वाढदिवसानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी साधकांना मार्गदर्शन केले. ते ऐकत असतांना माझे शरीर हलके होऊन तरंगत असल्याप्रमाणे मला जाणवत होते.’
४. कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मनात किती कृतज्ञताभाव आहे !’, हे शिकता येणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ नमस्काराच्या मुद्रेत उभ्या राहून प्रत्येक साधकाकडे बघत होत्या. त्या वेळी ‘त्यांच्या मनात किती कृतज्ञताभाव आहे !’, हे मला शिकता आले. एका क्षणासाठी मला कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात गेल्यासारखे जाणवले.’
५. सौ. तन्वी सरमळकर, तिस्क, फोंडा, गोवा.
५ अ. एखादा भक्त आपल्या माय माऊलीला भेटण्यासाठी जसा आतूर असेल, तशी मनाची स्थिती होऊन निर्विचार अवस्था अनुभवणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा होत असतांना त्यांच्या खोलीमध्ये जाण्याचे भाग्य मला लाभले. ‘एखादा भक्त आपल्या माय माऊलीला भेटण्यासाठी जसा आतूर असेल’, तशी माझ्या मनाची स्थिती झाली होती. मला निर्विचार स्थिती जाणवून ‘केवळ त्यांचे दर्शन केव्हा होईल ?’, अशीच माझ्या मनामध्ये आस होती. मनाला एक प्रकारची शांती अनुभवता येत होती. ‘देवीचे आम्हाला दर्शन होईल,’, या विचारामुळे माझी भावजागृती होत होती.
५ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चरण पुष्कळ तेजस्वी दिसून वातावरणात चंदेरी कण प्रक्षेपित होतांना दिसणे : मला त्यांचे चरण पुष्कळ तेजस्वी दिसू लागले. मी त्यांच्या चरणांची मनोमन पाद्यपूजा चालू केली. मी सूक्ष्मातून ओंजळ भरून सुगंधी पुष्पे त्यांच्या चरणांवर वहात होते. ‘त्यांचे दिव्य रूप पहातच रहावे’, असे मला वाटत होते. वातावरणामध्ये चंदेरी कण प्रक्षेपित होतांना दिसत होते. एका क्षणासाठी विद्युत् यंत्रणा खंडीत झाली. तेव्हा मला त्यांच्या मागे तेजस्वी प्रकाश दिसत होता.
५ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मधुर वाणीतून चैतन्याचे गोळे प्रक्षेपित होऊन त्यांतून मनाला सकारात्मकता येऊन पुष्कळ ऊर्जा मिळाल्याचे जाणवणे : ‘त्यांच्या मुखातून आम्हा सर्व साधकांसाठी चैतन्याचे गोळे प्रक्षेपित होत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसत होते. ‘त्यांचे मधुर शब्द ऐकतच रहावे आणि ते शब्द थेट अंतर्मनामध्ये जात आहेत’, असे मला वाटत होते. त्या सांगत असल्याप्रमाणे कृती करण्याचे विचार वाढून मनाला सकारात्मकता येऊन पुष्कळ ऊर्जा मिळाल्याचे जाणवले. त्यांच्या मुखावरील विविध भाव अनुभवायला मिळत होते. ‘हे गुरुदेवा, आपल्याला आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदामाऊलींना जसे अपेक्षित आहे’, तसेच प्रयत्न आम्हा सर्व साधकांकडून होऊ दे’, अशीच आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ७.१०.२०२१)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/614611.html |
|