सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. प्रथम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरात पाऊस पडणे
‘वर्ष २०१२ मध्ये रामनाथी, गोवा येथे आयोजित केलेल्या प्रथम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरात पाऊस पडत होता. त्या वेळी माझ्या मनात विचार आले, ‘पावसात अधिवेशन कसे पार पडणार ? चित्रीकरण आणि अन्य सेवा करतांना अडचणी येतील.’
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना करायला सांगणे
मी या विचारांतच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कपडे वाळत घालत होते. मी खिडकीतून बाहेर पहात असतांना माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉक्टरही बाहेर पहात आहेत.’ ते मला म्हणाले, ‘‘आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पाऊस पडत आहे. तू पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना कर.’’
३. त्यांचे आज्ञापालन करण्यासाठी मी त्यांच्यासमोर उभी राहून प्रार्थना केली, ‘प.पू. डॉक्टर, पावसामुळे अधिवेशनात येणारे सर्व अडथळे दूर होऊ देत.’ मी प्रार्थना करत असतांना परात्पर गुरु डॉक्टर खिडकीतून बाहेर पहात होते. आश्चर्य म्हणजे त्याच क्षणी पाऊस थांबला आणि नंतर ३ दिवस पाऊस पडला नाही.
४. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे पंचतत्त्वांवर नियंत्रण आहे’, याची मी प्रचीती घेतली.’
– सुश्री (कु.) कल्याणी गांगण (आताची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |