घरात घुसून  केलेल्या मारहाणीत हिंदु तरुणीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी दोघा मुसलमानांना अटक

  • उत्तरप्रदेशातील मुसलमानबहुल गावातील घटना !

  • निष्काळजीपणा करणारे पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल मूसेपूर गावामध्ये हिंदु मुलीला घरात घुसून केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी  सलीमुद्दीन आणि आसिफ अली या दोघांना अटक केली. १२ सप्टेंबर या दिवशी तिला मारहाण करण्यात आली होती. यात ती घायाळ झाली. तिच्यावर उपचार चालू असतांना १६ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुनील कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. (अशांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक ! – संपादक) सध्या गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमान बहुसंख्य झाल्यावर काय होते, हे निधर्मीवादी लक्षात घेतील तो सुदिन !