छत्तीसगडच्या बालाजी मंदिरात आयोजित केलेला ‘फॅशन शो’ बजरंग दलाने उधळला !

आयोजकांमध्ये एकजण मुसलमान !

रायपूर (छत्तीसगड) – येथील फुंडहर भागातील सालासर बालाजी मंदिरामध्ये एफ्.डी.सी.ए. नावाच्या आस्थापनाने आरिफ आणि मनीष या आयोजकांद्वारे एका ‘फॅशन शो’चे आयोजन केले होते. यात पाश्‍चात्त्य वेशभूषा परिधान केलेल्या अनेक तरुणी सहभागी झाल्या होत्या. आयोजनाला प्रारंभ झाल्यानंतर काही वेळातच बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथे पोचले आणि त्यांने हा कार्यक्रम बंद पाडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली अन् कार्यक्रम रहित केला.

या काळात सहभागी तरुणी मंदिराबाहेर निघून गेल्या होत्या. विरोधाच्या वेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. बजरंग दलाने या प्रकरणी पोलिसांत धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदवली आहे. या आयोजनाच्या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. या व्हिडिआमध्ये हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) घातलेली एक महिलाही दिसत आहे.

संपादकीय भूमिका

  • चर्च किंवा मशीद येथे कधी असे आयोजन करण्यात आल्याचे ऐकले आहे का ?
  • हिंदूंना स्वतःचा धर्म, तसेच ‘धर्मस्थळांचे पावित्र्य कसे राखावे ?’, याचे ज्ञान नसल्याने ते अशा प्रकारची धर्मद्रोही कृती करतात आणि देवाच्या अवकृपेला पात्र होतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही !