पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील बाँबस्फोटात ८ जण ठार

खैबर पख्तूनख्वा (पाकिस्तान) – येथे झालेल्या एका बाँबस्फोटामध्ये २ पोलिसांसह ८ जण ठार झाले. हा बाँबस्फोट ग्राम रक्षा परिषदेचे सदस्य इद्रीस खान यांना लक्ष्य करून करण्यात आला होता. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेले नाही.