लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) – येथे १४ सप्टेंबर या दिवशी दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार आणि नंतर हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली. छोटू गौतम, जुनैद, सुहेल, करीमुद्दीन, आरिफ आणि हाफिजूर रहमान अशी त्यांची नावे आहेत. एका आरोपीला अटक करतांना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या मुली आरोपी तरुणांसमवेत स्वतः गेल्याचे म्हटले आहे. या मुलींच्या आईने मात्र आरोपींनी त्यांना पळवून नेल्याचे म्हटले होते.
लखीमपुर खीरी मामले में पोस्टमार्टम में गैंग रेप की पुष्टि हुई है और सभी ६ आरोपी पुलिस की गिरफ़्त में हैं। लेकिन सवाल ये है कि कैसे बेख़ौफ़ होकर ऐसे लोग गैंग रेप और हत्या को अंजाम दे रहे हैं! https://t.co/kHZcTshsRJ
— Kadambini Sharma (@SharmaKadambini) September 15, 2022
पोलिसांनी म्हटले की, छोटूने मुलींची अन्य तरुणांशी ओळख करून दिली होती. घटनेच्या वेळी तो उपस्थित नव्हता. मुलींना जुनैद आणि सुहेल यांच्यासमवेत विवाह करायचा होता आणि त्यासाठी त्या दबाव टाकत होत्या. त्यांनी मुलींशी शारीरिक संबंध ठेवले होते. घटनेच्या वेळी संबंध ठेवल्यानंतर त्यांचा गळा दाबून खून केल्यावर त्यांना फासावर लटकावण्यात आले, जेणेकरून हा खून आत्महत्येसारखा वाटावा.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना इस्लामी देशांत ज्या प्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा देतात, तशी शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |