मृतदेह दीड मासांपासून अंत्यसंस्काराविना !
नंदुरबार – जिल्ह्यातील धडगाव येथील एका आदिवासी विवाहित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. असे असतांनाही पोलिसांनी केवळ आत्महत्येची नोंद केली आहे, असा आरोप करून मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो ४३ दिवसांपासून मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला आहे. ‘या प्रकरणी पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. धडगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. जोपर्यंत पुन्हा शवविच्छेदन केले जात नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही. पीडितेचे मृत्यूपूर्वी अत्याचार केल्याविषयीच्या भ्रमणभाष संभाषणाच्या अनुषंगाने पोलिसांनी अन्वेषण केले नाही’, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
१. पीडितेचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात ठेवून तिचे वडील आणि ग्रामस्थ यांनी न्यायासाठी धडगाव पोलीस ठाणे ते पोलीस अधीक्षक कार्यालय अशी पायपीट केली आहे.
२. अटक केलेले ३ संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करण्याची सूचना अधीक्षकांनी धडगाव पोलीस ठाण्यास केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तालुका दंडाधिकार्यांना पत्र पाठवले आहे.
३. ‘‘शवविच्छेदनाच्या वेळी पोलिसांनी आत्महत्येच्या अनुषंगाने विच्छेदन करण्यास सांगितले होते. तिच्यावर अत्याचार झाल्याचे पोलिसांनी सांगितले नाही, त्यामुळे तसे विच्छेदन झाले नाही’’, असे धडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्याची ध्वनीफीत कुटुंबियांकडून सादर करण्यात आली आहे.
४. ही पीडित विवाहिता माहेरी असतांना १ ऑगस्ट या दिवशी ही घटना घडली आहे. तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार जवळच्याच गावातील तिच्या परिचयाच्या रणजित ठाकरे आणि अन्य एकाने तिला बळजोरीने दुचाकीवर बसवून गावाबाहेर नेले. ‘रणजितसह ४ जण माझ्यावर अत्याचार करत असून ते मला ठार मारतील’, अशी भीती तिने भ्रमणभाषवर व्यक्त केली. त्यानंतर काही वेळेतच वावी येथील आंब्याच्या झाडाला तिने गळफास घेतल्याचे तिच्या कुटुंबियांना कळवण्यात आले.
संपादकीय भूमिका
|