ठाणे येथे सामाजिक माध्यमांत आमदारांचे आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड केल्याप्रकरणी दोषारोपपत्र प्रविष्ट

जितेंद्र आव्हाड

ठाणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाणे येथे ५ एप्रिल २०२० यादिवशी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी आता वर्तकनगर पोलिसांकडून ठाणे न्यायालयात १३ सप्टेंबर २०२२ यादिवशी दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी अनंत करमुसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.