
जत (जिल्हा सांगली), १४ सप्टेंबर (वार्ता.) – लवंगा येथील घटनेचे कसून अन्वेषण व्हावे आणि दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी. २ वर्षांपूर्वी पालघर येथे अशाच पद्धतीने जमावाकडून हिंदु साधू-संतांना झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. अशा पद्धतीने समाजविघातक घटनेची पुनरावृत्ती होत असल्याने ‘साधू-संतांचा देश असलेल्या भारतात जाणीवपूर्वक साधू-संतांना लक्ष्य केले जात आहे का ?’, याचे अन्वेषण करावे, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने जत पोलीस ठाणे, तसेच प्रांत कार्यालयात देण्यात आले. याप्रसंगी बजरंग दलाचे सर्वश्री रागवेंद्र आवलकी, राहुल गुरव, सुनील चव्हाण, गौडाप्पा मदभावी, इरप्पा मुढशी, ओंकार घेज्जी, भैरू धोडमल, विकास बागडे, सुनील शिवपुजी, कलमेश हिप्पर्गी, गुरु कोळी, मुर्गेश ब्याडगी, श्रीधर मुरगुंडी, बसू कर्पे उपस्थित होते.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !