१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘यांचे बोलणे ऐकून काय वाटते ?’, असे विचारणे
‘परात्पर गुरु डॉक्टरांना एकदा भेटलो असता माझ्या मनाची सध्याची स्थिती सांगत होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर तेथे उपस्थित असलेल्या अन्य साधकांना म्हणाले, ‘‘यांचे बोलणे ऐकून सगळ्यांना काय वाटते ?’’ त्या वेळी काही साधकांनी ‘प्रत्यक्ष देवदेवता, ऋषिमुनी आले आहेत आणि ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या मागे दिसत आहेत’, असे सांगितले. काही साधकांनी ‘मधुसूदन कुलकर्णीकाकांचे पूर्वज आले असून ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी आले आहेत’, असे सांगितले.
२. स्वतः श्राद्ध-पक्ष करत नसल्यामुळे ‘स्वतःचे काही चुकते’, असे वाटणे
मी मागील काही वर्षांपासून श्राद्ध-पक्ष करत नाही. माझा धाकटा भाऊ करतो; पण मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होतो. त्यामुळे माझ्या मनात सातत्याने ‘मी श्राद्ध-पक्ष करत नाही, तर माझे काही चुकत आहे का ?’, असा विचार यायचा.
३. गुरुदेवांनी ‘कुलकर्णींचे पूर्वज मुक्त झाले’, असे सांगिलत्यावर पुष्कळ हलकेपणा जाणवणे
परात्पर गुरु डॉक्टर आठवले म्हणाले, ‘‘बघा, कुलकर्णींचे पूर्वज मुक्त झाले.’’ परात्पर गुरु डॉक्टरांनी असे म्हटल्यापासून माझ्या मनाला हलके वाटून इतका आनंद होत आहे की, तो काय वर्णावा ? मला आतून आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. माझे भाववृद्धीसाठी करायचे प्रयत्न आणि ईश्वराच्या अनुसंधानात रहायचा कालावधी वाढला आहे. राग, चिडचिड आदी स्वभावदोष पुष्कळ न्यून होऊन माझी अंतर्मुखता, शांतपणा आणि स्थिरता वाढली आहे.
पूर्वज सतत मला अडथळा आणून ‘मला मुक्त करा’, असे स्मरण करून देत होते; पण आमच्यामध्ये त्यांना मुक्त करण्याची शक्ती कुठे आहे ? परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या पूर्वजांना मुक्त केले. ‘तेच आमच्याकडून साधना करून घेत आहेत आणि साधनेतील अडथळे दूर करून पुढे पुढे नेत आहेत’, असे सतत वाटते. आता मला फार चांगले वाटत आहे.’
– चरणसेवक,
श्री. मधुसूदन कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |