परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले भेटण्यापूर्वी मनात आलेले विचार

अ.  ‘गुरुदेवांशी मी काय बोलणार ? ते सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान आहेत.

आ. भगवंताला आपला आंतरिक भाव आणि भक्ती हवी आहे. तो भावाचा भुकेला आहे.’

सौ. अनिता लटपटे

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. गुरुदेव समोर दिसल्यावर ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटले.

आ. ते श्रीहरि विष्णूच्या रूपात पुष्कळ उंच दिसत होते. त्यांची त्वचा पूर्ण गुलाबी दिसत होती.

इ. मला त्यांच्या कपाळावर त्रिशूळ दिसले.

ई. परात्पर गुरु डॉक्टर ‘सर्वांना चैतन्य देत आहेत’, असेच मला वाटले.

उ. मला भगवंताला भेटून पुष्कळ आनंद झाला.’

३. श्रीकृष्णाच्या चित्राकडे आणि प.पू. भक्तराज महाराज अन् त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

एका सत्संगात साधकांना ‘श्रीकृष्णाच्या चित्राकडे आणि प.पू. भक्तराज महाराज अन् त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे पाहून काय जाणवते ?’, हा प्रयोग करून घेण्यात आला.

अ. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून ‘भगवान श्रीकृष्ण साक्षात् इथे उभा आहे. त्याच्या हातातील सुर्दशनचक्र फिरत आहे. त्याचे डोळे पुष्कळ बोलके आहेत आणि तो साधकांकडे बघून आनंदी झाला आहे’, असे मला जाणवले.

आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते प्रत्यक्ष समोर उभे असून त्यांच्या काठीने साधकांवर उपाय करत आहेत. त्यांनी साधकांच्या भोवती संरक्षककवच निर्माण केले आहे आणि ते सर्वांचे रक्षण करत आहे’, असे मला वाटले.

इ. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून मला पुष्कळ आनंद झाला. ‘साक्षात् गुरुदेवच आले असून त्यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करत आहे’, असे मला वाटले.

– सौ. अनिता भाऊसाहेब लटपटे, संभाजीनगर, महाराष्ट्र (१०.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक