चंदौली – उत्तरप्रदेशातील चंदौली येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानांनी दगडफेक केली. त्यानंतर मुसलमानांनी हिंदूंना मारहाण केली. या वेळी ६ जण घायाळ झाले, तर अनेक वाहनांची हानी झाली. याविषयीची माहिती मिळताच अलीनगर आणि मुगलसराय येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सामाजिक माध्यमावर प्रसारित झाला आहे.
चंदौली
➡गणेश चतुर्थी प्रतिमा विसर्जन के दौरान विवाद
➡दो पक्षों में जमकर चले ईंट-पत्थर, कई लोग घायल
➡मारपीट के दौरान तमाशबीन बनी रही पुलिस
➡एक पक्ष ने घर में घुसकर तोड़फोड़ का आरोप लगाया।#Chandauli pic.twitter.com/Kw0fpyxI1X
— भारत समाचार (@bstvlive) September 3, 2022
श्री गणेशोत्सवाच्या अंतर्गत अलीनगरमध्ये श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मुसलमानांच्या वस्तीतून जात असतांना अचानक मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. त्यानंतर हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये हाणामारी चालू झाली. ‘मुसलमानांनी मुद्दाम एका जनावराला मिरवणुकीमध्ये घुसवले. त्यामुळे वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाले’, असा आरोप हिंदूंनी केला.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मिवणुकांवर आक्रमण करून त्यांना त्रास देण्याचा विचारही अल्पसंख्यांकांच्या मनात येऊ नये, एवढी वचक पोलीस निर्माण करतील का ? |