सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. ‘ऑनलाईन’ सत्संगापूर्वी गुरुदेवांचे स्मरण आणि ‘त्यांना शरण जाणे’, असे भावप्रयोग घेतल्यावर सत्संग भावपूर्ण होणे
‘जिल्ह्यात ‘ऑनलाईन’ सत्संग आणि व्यष्टी साधनेचे आढावे घेतांना आरंभी मी साधकांकडून भावप्रयोग करून घेत असे. गुरुदेवांचे स्मरण (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) आणि ‘त्यांना शरण जाणे’, असे भावप्रयोग घेतल्यावर ‘ऑनलाईन’ सत्संग भावपूर्ण होतात आणि तेथे भावाचे वातावरण निर्माण होत असे. सर्व साधक गुरुदेवांच्या चरणी शरण जातात आणि त्यांच्यात समष्टी भाव निर्माण होतो.
२. कोरोनामुळे दळणवळण बंदी लागू झाल्यावर घरात राहून गुरुदेवांचे स्मरण केल्यावर विज्ञापन मिळवणे इत्यादी सेवा लवकर पूर्ण होत असल्याची अनुभूती येणे
कोरोनामुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीपूर्वी ‘विज्ञापन मिळवणे किंवा ‘सनातन’ पंचांगांचे वितरण करणे’, या सेवा बाहेर जाऊन केल्यावर पूर्ण होत होत्या; परंतु दळणवळण बंदी लागू झाल्यावर ‘घरात राहून गुरुदेवांचे स्मरण केल्यावर त्या लवकर पूर्ण होतात’, अशी अनुभूती सर्व साधकांनी घेतली. रामायणात वानरसेनेचा प्रभु रामचंद्राप्रती असलेला भाव आणि श्रद्धा यांमुळे दगडावर ‘श्रीराम’नाम लिहिल्यावर ते पाण्यावर तरंगत होते, तसे ‘आपत्काळात ‘गुरुस्मरण’ सर्व साधकांना तारून नेणार आहे’, अशी अनुभूती मी घेतली.’
– सौ. स्मिता कानडे (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), धारवाड, कर्नाटक. (५.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |