दिलशादने केले अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि निकाह !

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – दिलशाद नावाच्या युवकाने येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिला हरियाणा येथे घेऊन जाऊन तिचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केले, तसेच तिच्याशी इस्लामी पद्धतीनुसार विवाह केला. पीडितेने काही दिवसांनी संधी मिळताच तिच्या भावाला संपर्क करून सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या साहाय्याने पीडितेला दिलशादच्या कह्यातून बाहेर काढले आणि त्याला अटक केली.

१. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार १७ वर्षीय पीडिता ही फतेहपूर जिल्ह्यातील थरियांव गावाची रहिवासी असून महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे, तर दिलशाद हा उत्तरप्रदेशातीलच उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ येथील आहे.

२. दिलशादने काही दिवसांपूर्वी तिचे अपहरण करून तिला हरियाणाला नेले. तेथे तिचे धर्मांतर करून निकाह केला आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.

३. २१ ऑगस्ट या दिवशी संधी मिळताच हिंदु पीडितेने तिच्या भावाला भ्रमणभाषवर संपर्क करून सांगितले की, मी येथे दिलशादच्या कह्यात आहे. मला कृपया लवकर येथून काढ, अन्यथा तो मला ठार मारील !

संपादकीय भूमिका

हिंदू अल्पसंख्य असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदु मुलींचे जीवन हैराण झाले आहे. दुसरीकडे बहुसंख्य हिंदूंच्या भारतातही हिंदु युवती आणि स्त्रिया या धर्मांध मुसलमानांपासून सुरक्षित नाहीत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पदच !