
पुणे – येथील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळा’च्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त १ सप्टेंबर या दिवशी अर्थवशीर्ष पठण करण्यात आले. पहाटे झालेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामध्ये उत्सव मंडपासमोर ३१ सहस्र महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाचे ३५ वे वर्ष आहे. पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगांनी भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करत महिलांनी गणरायाला अभिवादन केले.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !