ग्रामपंचायत घराची नोंद करत नसल्याने खेड (पुणे) येथील अपंग तरुण भ्रमणभाषच्या मनोर्‍यावर चढला !

वाकी बुद्रुक (ता. खेड) – अनेक वेळा हेलपाटे घालूनही रहात्या घराची नोंद ग्रामपंचायत करत नसल्याने येथील जीवन टोपे हा अपंग तरुण २९ ऑगस्ट या दिवशी भ्रमणभाषच्या मनोर्‍यावर चढला. तो जवळपास १ घंटा मनोर्‍यावरच बसून होता. ‘माझ्या घराची नोंद करा नाही, तर मी टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करीन’, असे तो वरून सांगत होता. शेवटी पोलिसांनी विनवणी करून ‘घराची नोंद करू’, असे सांगितल्यावर हा तरुण मनोर्‍यावरून खाली उतरला.

संपादकीय भूमिका

हा आहे ग्रामपंचायतीचा कारभार ! यामध्ये या अपंग तरुणाचे काही बरे-वाईट झाले असते, तर त्याचे दायित्व कोण घेणार होते ? आतातरी ग्रामपंचायतीने स्वत:चे दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा !