परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ ही मानवजातीसाठी अत्यंत उपयुक्त असलेली पद्धत कुणीच न दिल्याने ‘अमोल चीज जो दी गुरुने, न दे सके भगवान भी ।’, असे म्हणावेसे वाटणे

सर्व साधकांना मोक्षाचा मार्ग दाखवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

श्री. रोहित साळुंके

‘देव भाव आणि भक्ती भरभरून देतो; परंतु ती टिकवून ठेवण्यासाठी काय करायला हवे; हे मात्र केवळ श्री गुरुच सांगतात. साधनेत भाव आणि भक्ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन होणे अत्यंत आवश्यक आहे. हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ओळखून त्यांनी सनातनच्या साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन ही प्रक्रिया शिकवली आहे. परात्पर गुरु डॉक्टर साधकांना ही प्रक्रिया शिकवून केवळ थांबले नाहीत, तर ‘साधक प्रक्रिया नियमितपणे राबवत आहेत ना ?’, हे पहाण्यासाठी त्यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्याची पद्धत निर्माण केली. केवळ सनातनच्या साधकांसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन पद्धत’ निर्माण केली आहे. मानवजातीला दिलेली त्यांनी ही एक अनमोल देणगीच आहे. त्यामुळेच म्हणावेसे वाटते ‘अमोल चीज जो दी गुरुने, न दे सके भगवान भी ।।’

– श्री. रोहित साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (२२.१२.२०२१)