परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली. पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय शोधून दिले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. पू. निर्मला दातेआजींना पाहिल्यावर साधक आणि संत यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. पू. (सौ.) मनीषा पाठक
‘‘मला ओंकार ऐकू आला. ‘पू. दातेआजी आपल्या बोलण्याला प्रतिसाद देत आहेत’, असे वाटते. ‘पू. आजींच्या गालावर चमक आहे’, असे वाटते.’’
२. पू. संदीप आळशी
‘‘पू. दातेआजींकडे पाहून ‘त्या बेशुद्ध आहेत’, असे न वाटता एखादी वयोवृद्ध व्यक्ती झोपली आहे.’, असे वाटते. पू. आजींच्या खोलीत आल्यावर पुष्कळ शांत वाटते. मी नियमितपणे ध्यानमंदिरात जाऊन जप करतो. तिथे जेवढा जप होतो, त्यापेक्षा अधिक चांगला जप पू. आजींच्या खोलीत झाला. ‘जप करायला या खोलीत यावे’, असे मला वाटते.’’
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
‘पू. आजींची त्वचा पिवळसर वाटत आहे. प.पू. डॉक्टर खोलीत येण्याच्या आधी वातावरणात थोडा चांगला पालट जाणवला. प.पू. डॉक्टरांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय करतांना ‘स्वतःच्या प्रत्येक चक्राची जागृती होत आहे आणि सहस्रार उघडले आहे’, असे जाणवले.’’
४. श्री. नरेंद्र दाते
‘‘आपण जे बोलतो, ते पू. दातेआजींना समजते’, असे वाटते.’’
५. सौ. सृष्टी गोगटे
‘‘पू. आजींच्या खोलीत मला ५ ते ७ मिनिटे गुलाबाचा सुगंध आला.’’
६. श्री. निरंजन दाते
‘‘सद्गुरु गाडगीळकाका आले, तेव्हा चंदनाचा सुगंध आला.’’
७. ‘पू. दातेआजी ज्या खोलीत आहेत, ती खोली आधीच्या तुलनेत मोठी आहे’, असे अनेक साधकांना जाणवत आहे.’
८. मंगळुरू सेवाकेंद्रातील साधिका सौ. मधुवंती चारुदत्त पिंगळे यांनी संदेशाद्वारे कळवलेले सूत्र
८ अ. स्वप्नात पू. निर्मला दातेआजींनी चैतन्य देऊन कृपा केल्याचे साधिकेला जाणवणे : ‘एकदा रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात ‘पू. निर्मला दातेआजी रामनाथी आश्रमात आहेत’, असे मला दिसले. ‘त्या नेहमी जशा आसंदीत बसलेल्या असतात, तशाच स्थितीत बसल्या असून मला त्या थोड्या कृश झाल्या आहेत’, असे दिसले. त्या वेळी त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज, हास्य आणि प्रेम जाणवले. ‘त्यांनी स्वप्नातच मला चैतन्य दिले आणि माझ्यावर कृपा केली’, असे मला वाटले.’
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०२४)
परात्पर गुरु डॉक्टर खोलीबाहेर जाण्यापूर्वी पू. दातेआजींनी पाय हालवणे
प.पू. डॉक्टर नामजपादी उपाय झाल्यानंतर पू. दातेआजींच्या खोलीतून बाहेर जाण्यापूर्वी पू. आजींच्या चरणांकडे पहातात. त्या वेळी पू. आजींचे पाय हलतात. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणतात, ‘‘पू. आजी निरोप देत आहेत’, असे मला वाटते.’’ – सौ. ज्योती दाते
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |