जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात भारतियांची निष्क्रीयता !

जिहादी आतंकवादाच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी हिंदूंनी प्रभावी संघटन करून सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक !

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयीचे कथित वक्तव्य केल्यावरून देशात जिहादी प्रवृत्तींनी शीर धडापासून वेगळे करण्याचे फतवे काढण्यास प्रारंभ केला आहे. यामध्ये उदयपूर (राजस्थान) येथील कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या विरोधात आणि देशात वाढत असलेल्या जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात हिंदूंची स्थिती विशद करणारा लेख येथे देत आहोत.

१. धर्मांधांनी कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या केल्यानंतर भारतियांनी त्याचा रस्त्यावर उतरून विरोध करण्याचे टाळणे

‘उदयपूर (राजस्थान)मध्ये धर्मांधांनी कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर देशात उद्विग्नता निर्माण झाली आहे. नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ केलेल्या एका कथित पोस्टमुळे (लिखाणामुळे) कन्हैयालाल यांना जीव गमवावा लागला. त्यांचे मारेकरी रियाज अख्तरी आणि गौस महंमद हे  धर्मांध मानसिकतेमुळे पछाडलेले होते. या धर्मांध मानसिकतेच्या कचाट्यात सापडलेले किती रियाज आणि गौस असतील की, जे धर्माच्या नावावर अनेक कन्हैयालालची हत्या करण्याची वाट पहात थांबले आहेत.

कन्हैयालाल यांची हत्या फ्रान्समधील सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येशी साम्य दर्शवते. ऑक्टोबर २०२० मध्ये एका चेचेन जिहादी आतंकवाद्याने फ्रान्समधील सॅम्युअल या शिक्षकाची हत्या केली. शिक्षक सॅम्युअल यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याविषयी बोलतांना त्यांच्या विद्यार्थ्यांना महंमद पैगंबर यांच्याविषयीची ‘शार्ली आब्दो’ मासिकातील वादग्रस्त व्यंगचित्रे दाखवली होती. त्यानंतर धर्मांधांकडून सॅम्युअल यांच्या विरोधात एक अभियान चालवण्यात आले होते. तशाच प्रकारचे अभियान नूपुर शर्मा, नवीनकुमार जिंदाल आणि त्यांचे समर्थक यांच्या विरोधातही चालवण्यात येत आहे.

सॅम्युअल यांच्या हत्येनंतर ‘आम्ही अशा जिहादी आतंकवाद्यांना शरण जाणार नाही’, असे उद्गार फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रा यांनी काढले. त्यानंतर संपूर्ण फ्रान्समधील जनता ‘आम्हीही सॅम्युअल पॅटी आहोत’, असे फलक घेऊन रस्त्यावर उतरली. आपल्याकडे असे काही झाल्याचे दिसले नाही.

२. जिहादी धर्मांधतेला प्रोत्साहन देण्यामध्ये धर्मनिरपेक्ष नेते, बुद्धीजिवी, कथित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांची महत्त्वाची भूमिका !

जे लोक कालपर्यंत नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांना ‘गुस्ताख-ए-रसूल’ (उद्धटपणे केलेले पातक) घोषित करत होते, ते आता कन्हैयालाल यांच्या हत्येची निंदा करत आहेत. जर हे सर्व जण या प्रकारच्या क्रूर हिंसाचाराच्या विरोधात आहेत, तर मग अशी स्थिती निर्माण का झाली की, ज्यात कन्हैयालालचा बळी गेला ? वास्तविक शिरच्छेद करण्याचे वातावरण निर्माण करणे आणि जिहादी धर्मांधतेला प्रोत्साहन देणे यांमागे स्वत: धर्मनिरपेक्ष समजणारे नेते, बुद्धीजिवी, कथित पत्रकार अन् सामाजिक कार्यकर्ते यांची महत्त्वाची भूमिका आहे. ते केवळ नूपुर शर्मा प्रकरण विकृत पद्धतीने प्रदर्शित करून थांबले नाहीत, तर त्यांनी ‘भारतात मुसलमानांना दुय्यम प्रकारची वागणूक मिळत आहे’, असा अपप्रचार चालवला. ज्ञानवापी प्रकरणी ‘आमच्या सर्व मशिदी कह्यात घेणार आहेत’, अशी ओरड करण्यात आली, हे खरे नाही का ? त्यांनी दूरचित्रवाहिनींवरील चर्चासत्रांमध्ये हिंदु देवीदेवतांविषयी केलेल्या वक्तव्यावर दिलेल्या प्रतिक्रियेला महंमद पैगंबर आणि इस्लाम यांच्या अवमानाचे सूत्र एवढे मोठे केले की, जगभरातील जिहादी विचारसरणीच्या लोकांना आयतेच खतपाणी मिळाले. जे ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा..’ (उद्धटपणे केलेले पातकाची शिक्षा एकच ती, म्हणजे शीर धडापासून वेगळे करणे) अशी घोषणा देत रस्त्यांवर उतरले होते, तेही कन्हैयालाल यांच्या हत्येला उत्तरदायी आहेत.

३. राजस्थान सरकारने जिहाद्यांचा बीमोड करण्याचे उत्तरप्रदेश सरकारकडून शिकले पाहिजे ! 

राजस्थानचे गहलोत सरकार त्यांच्या राज्यात वाढत असलेल्या धर्मांधतेची कोणतीही तक्रार ऐकायला सिद्ध नाही. हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे झाली, तरीही सरकारच्या दृष्टीकोनामध्ये थोडाही पालट झाला नाही. कन्हैयालाल यांच्या हत्येसाठी स्वत:ला दोषी ठरवण्यापेक्षा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाच देशाला हिंसाचाराच्या विरोधात संबोधित करण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या वागणुकीमुळेच धर्मांधांचे मनोबल वाढते.

ऑक्टोबर २०१९ मध्ये उत्तरप्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची हत्या झाली. त्यानंतर जिहादी प्रवृत्तींचे मनोबल खच्ची होईल, अशा प्रकारचे प्रयत्न योगी सरकार करत आहे. काही दिवसांपूर्वी शुक्रवारच्या नमाजानंतर रस्त्यावर उतरून हिंसाचार करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात योगी सरकारने केलेली कठोर कारवाई हे त्याचे चांगले उदाहरण आहे; पण राजस्थान आणि अन्य राज्य सरकारे उत्तरप्रदेशकडून शिकण्यास सिद्ध नाहीत.

४. ‘सेक्युलर’ (निधर्मी) पत्रकारांकडून मुसलमानांच्या मनात हिंदुद्वेष पसरवण्यात येत असल्याने जिहादी प्रवृत्ती वाढणे

भारताचा एकही मुसलमान नेता, बुद्धीजिवी किंवा मौलाना  (इस्लामचे धार्मिक नेते) यांनी नूपुर शर्मांचे समर्थन केले नाही. उलट कथित पत्रकारांनी जुबैरच्या अटकेला मोदी सरकारचे मुसलमानविरोधी धोरण कारणीभूत असल्याचे म्हटले. अशा भूमिकेमुळेच देशात धर्मांधता वाढली असून त्यात निरपराध लोकांचे बळी जात आहेत. ‘गुजरात दंगलीमागे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार यांचे कोणतेही षड्यंत्र नव्हते’, असे सर्वाेच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले आहे; परंतु ‘मागील २० वर्षांपासून गुजरात सरकारने जाणीवपूर्वक मुसलमानांचा संहार केला’, असाच अपप्रचार करण्यात आला. सप्टेंबर २००२ मध्ये गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरावर आतंकवादी आक्रमण करण्यात आले. त्यानंतर अनेक वर्षे अशा प्रकारच्या आक्रमणांमध्ये पकडण्यात आलेल्या आतंकवाद्यांचे जवळपास हेच म्हणणे होते, ‘गुजरातमधील मुसलमानांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी त्यांनी तसे केले आहे.’ बाटला हाऊस चकमकीला खोटे ठरवण्याचे सर्व प्रयत्न झाले. या अपप्रचारामुळे मुसलमान युवकांच्या एका समुहाने ‘इंडियन मुजाहिदीन’ संघटना बनवली आणि अनेक आतंकवादी आक्रमणे केली.

५. भारतियांनी जिहादी आतंकवादाच्या विरोधात रस्त्यावर उतरून वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक !

वास्तविक आपल्या समोर फ्रान्सचे उदाहरण आहे. जो अनेक आतंकवादी आक्रमण सहन केल्यानंतरही शरण गेला नाही, तो यासाठी झुकला नाही; कारण तेथील जनता उघडपणे जिहादी विचारांच्या विरोधात रस्त्यावर उतरली होती. भारताची समस्या ही आहे की, विरोध करणारे केवळ सामाजिक माध्यमांवरच राग काढण्यापर्यंत मर्यादित राहिले आहेत. काही लोक रागाच्या भरात हिंसाचार करणे चालू करतात. त्यामुळे धर्मांध मानसिकतेवर उदारमतवादाचा मुखवटा चढवलेल्या कुत्सित लोकांचेच उद्देश पूर्ण होतात. फ्रान्सच्या लोकांनी विरोध प्रदर्शित करतांना हिंसाचार केला नाही. जेव्हाही त्यांच्या देशात आतंकवादी आक्रमणे झाली, तेव्हा त्यांनी रस्त्यावर उतरून अहिंसक आंदोलने केली. तेच भारतात झाले पाहिजे. अहिंसक आंदोलनाच्या माध्यमातून जिहादी प्रवृत्ती आणि त्यांचे समर्थक यांचा प्रतिकार होईल, कठोर कारवाईसाठी सरकारवर दबाव वाढेल, तसेच खोटे धर्मनिरपेक्षवादी, उदारमतवादी नेते, पत्रकार आणि कार्यकर्ते यांच्यामध्येही मोठ्या प्रमाणात जनआक्रोशाची भीती निर्माण होईल. त्यामुळे लोकशाही व्यवस्था योग्य पद्धतीने चालू रहाण्यास साहाय्य होईल.’

– अवधेश कुमार, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकारणाचे विश्लेषक

(साभार : साप्ताहिक ‘हिंदु विश्व’, १ ते १५ ऑगस्ट २०२२)